रिझवीची जेतेपदाकडे भक्कम वाटचाल, डॉन बॉस्को संघ अडचणीत

तन्वर सिंग (१२७) आणि तेजस चाळके (१००) यांच्या दमदार शतकाच्या जोरावर बलाढ्य रिझवी स्प्रिंगफिल्डने गाईल्स शिल्ड आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात डॉन बॉस्कोविरुद्ध पहिला डाव ८ बाद ४९५ धावांवर घोषित केला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 11:18 PM2018-01-09T23:18:21+5:302018-01-09T23:20:07+5:30

whatsapp join usJoin us
Rizvi stepped in to win the title, the loss of the Don Bosco team | रिझवीची जेतेपदाकडे भक्कम वाटचाल, डॉन बॉस्को संघ अडचणीत

रिझवीची जेतेपदाकडे भक्कम वाटचाल, डॉन बॉस्को संघ अडचणीत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : तन्वर सिंग (१२७) आणि तेजस चाळके (१००) यांच्या दमदार शतकाच्या जोरावर बलाढ्य रिझवी स्प्रिंगफिल्डने गाईल्स शिल्ड आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात डॉन बॉस्कोविरुद्ध पहिला डाव ८ बाद ४९५ धावांवर घोषित केला. यानंतर मंगळवारी दुसºया दिवसअखेर डॉन बॉस्कोची ४ बाद ५३ धावा अशी केविलवाणी अवस्था करुन रुझवीने जेतेपदाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे.
वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात प्रथमा फलंदाजीचा निर्णय घेताना रिझवीच्या फलंदाजांनी अपेक्षित कामगिरी केली. सावध सुरुवात करुन खेळपट्टीचा अंदाज घेतल्यानंतर चौफेर फटकेबाजी करत रिझवीने डॉन बॉस्कोच्या गोलंदाजांंंचा समाचार घेतला. तन्वरने २३३ चेंडू खेळताना १३ चौकर व एका षटकारासह १२७ धावांची खेळी केली. तेजसनेही महत्त्वपूर्ण शतक झळकावाताना १५८ चेंडूत १४ चौकारांसह १०० धावा काढल्या. या दोघांशिवाय अभिनव सिंग (८५), उमर खान (५७), ओवेस खान (४७) आणि ओवेस शेख (४७) यांंनीही चांगली फलंदाजी केली. डॉन बॉक्सोच्या ख्रिस डी’ब्रेटो याने ९० धावांत ३ बळी घेत चांगला मारा केला.
यानंतर फलंदाजीला उतरलेल्या डॉन बॉस्कोची सुरुवात अडखळती झाली. रिझवीची भेदक गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण यापुढे डॉन बॉस्कोने ५३ धावांमध्येच ४ प्रमुख फलंदाज गमावले. उमर खान याने ६ धावांमध्ये २ महत्त्वाचे बळी घेत डॉन बॉस्कोला खिंडार पाडले. तसेच, फाझ खान याने एक बळी घेताना एक धावबाद करत डॉन बॉस्कोला बॅकफूटवर आणले. दुसºया दिवसाचा खेळ थांबला तेव्हा साहिल जाधव (१६*) आणि सोहम नलावडे (०*) खेळपट्टीवर होते. डॉन बॉस्को संघ अजून ४४२ धावांनी पिछाडीवर असून त्यांचे ६ फलंदाज शिल्लक आहेत.

संक्षिप्त धावफलक
रिझवी स्प्रिंगफिल्ड (पहिला डाव) : १३५.२ षटकांमध्ये ८ बाद ४९५ धावा घोषित (तन्वर सिंग १२७, तेजस चाळके १००, उमर खान ५७; ख्रिस डी’ब्रेटो ३/९०)
डॉन बॉस्को (पहिला डाव) : २३ षटकांमध्ये ४ बाद ५३ धावा (अ‍ॅलन बावचन १८, साहिल जाधव खेळत आहे १६, सोहम नलावडे खेळत आहे ०; उमर खान २/६)

Web Title: Rizvi stepped in to win the title, the loss of the Don Bosco team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.