इंग्लंडच्या विजयात पावसाचा खोळंबा

मेलबोर्न : चौथ्या अ‍ॅशेस कसोटीत इंग्लंडच्या विजयी मनसुब्यांवर पावसाने पाणी फेरले. चौथ्या दिवशी अर्ध्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:28 AM2017-12-30T00:28:43+5:302017-12-30T00:28:49+5:30

whatsapp join usJoin us
Rain fall in England's victory | इंग्लंडच्या विजयात पावसाचा खोळंबा

इंग्लंडच्या विजयात पावसाचा खोळंबा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मेलबोर्न : चौथ्या अ‍ॅशेस कसोटीत इंग्लंडच्या विजयी मनसुब्यांवर पावसाने पाणी फेरले. चौथ्या दिवशी अर्ध्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. पंचांनी खेळ संपविण्याचा निर्णय घेतला तेव्हा पहिल्या डावात ३२७ धावा उभारणा-या आॅस्ट्रेलियाने दुस-या डावात २ बाद १०३ धावा केल्या होत्या. इंग्लंडचा पहिला डाव ४९१ धावांवर आटोपला. यजमान संघ अद्याप पाहुण्यांच्या तुलनेत ६१ धावांनी मागे असून डेव्हिड वॉर्नर (४०) व स्टीव्ह स्मिथ(२५) हे खेळत आहेत.
अ‍ॅलिस्टर कूकने नाबाद २४४ धावा केल्या. त्यानंतर कॅमेरुन बेनक्रॉफ्ट - उस्मान ख्वाजा यांना बाद करत आॅस्ट्रेलियावर दडपण आणले. अ‍ॅशेस मालिका गमविणारा इंग्लंड संघ विजयाच्या प्रतीक्षेत आहे.

Web Title: Rain fall in England's victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.