खेळाडूंच्या फॉर्मला महत्त्व मिळायला हवे

गेल्या आठवड्यात भारताने अपेक्षेप्रमाणे टी-२० लढतींमध्ये आयर्लंडविरुद्ध वर्चस्व गाजवले आणि या कामगिरीचे कुणाला आश्चर्य वाटले नाही. आयर्लंडच्या खेळाडूंनी विराट कोहलीच्या बलाढ्य संघापुढे नांगी टाकली ते बघून त्यांचे चाहते नक्कीच निराश झाले असतील.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 02:28 AM2018-07-03T02:28:45+5:302018-07-03T02:29:11+5:30

whatsapp join usJoin us
 Players' form must be of great importance | खेळाडूंच्या फॉर्मला महत्त्व मिळायला हवे

खेळाडूंच्या फॉर्मला महत्त्व मिळायला हवे

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- व्हीव्हीएस लक्ष्मण लिहितात...

गेल्या आठवड्यात भारताने अपेक्षेप्रमाणे टी-२० लढतींमध्ये आयर्लंडविरुद्ध वर्चस्व गाजवले आणि या कामगिरीचे कुणाला आश्चर्य वाटले नाही. आयर्लंडच्या खेळाडूंनी विराट कोहलीच्या बलाढ्य संघापुढे नांगी टाकली ते बघून त्यांचे चाहते नक्कीच निराश झाले असतील. भारताविरुद्ध आपल्या पदार्पणाच्या कसोटीत अफगाणिस्तान संघ दोन दिवसांतच पराभूत झाला. या पराभवातून त्यांनी नक्कीच बोध घेतला असेल. आयर्लंडही या अनुभवातून बोध घेण्याचा प्रयत्न करेल.
भारताच्या प्रदीर्घ कालावधीच्या इंग्लंड दौऱ्याच्या तयारीच्या दृष्टीने आयर्लंडविरुद्धची मालिका चांगली मानायला हवी. आॅस्ट्रेलियाविरुद्ध अलीकडेच वन-डे मालिकेत वर्चस्व गाजविणाºया संघाविरुद्ध भारताने टी-२० मालिकेची चांगली सुरुवात करायला हवी. अशा स्थितीत फलंदाजांच्या निवडीबाबत विराट कोहली आणि रवी शास्त्री सखोल चर्चा करतील. आयर्लंडमध्ये (भारतीय संघातील खेळाडू) सर्व भारतीय फॉर्मात असल्याचे दिसून आले आणि संघव्यवस्थापनासाठी संघाची निवड करणे चांगली डोकदुखी ठरणार आहे. निवड समिती खेळाडूंच्या नावापेक्षा सध्याच्या फॉर्मचा विचार करेल, असा मला विश्वास आहे.
माझ्या मते सहाव्या स्पेशालिस्ट गोलंदाजी पर्यायाला पसंती राहील. कृणाल पांड्याचा समावेश केला तर फलंदाजीची बाजू कमकुवत न करता पर्याय पूर्ण होऊ शकतो, पण विराट कोहलीही असा विचार करीत आहे का, याबाबत उत्सुकता आहे. इंग्लंडने डावखुºया फिरकीपटूविरुद्ध वर्चस्व गाजवले असून येथील वातावरण शुष्क व उष्ण आहे. फिरकीपटूंना संधी देण्यासाठी ही आदर्श स्थिती आहे. इंग्लंडची फलंदाजीची बाजू मजबूत आहे.
दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती भारतासाठी मोठा धक्का आहे, पण त्यामुळे उमेश यादवसाठी संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे त्याला टी-२० मधील पुनरागमन कायम राखता येईल. भुवनेश्वर कुमार व बुमराह वेगवान गोलंदाजीमध्ये चांगले संयोजन आहे. विशेषता डेथ ओव्हर्समध्ये बुमराहचे वेगवान यॉर्कर आणि चेंडूच्या वेगातील बदल लाभदायक ठरतो. भुवनेश्वरला आता दुसºया टोकाकडून डावाच्या सुरुवातीला व शेवटी नव्या जोडीदाराची गरज भासेल.
दरम्यान, त्यासाठी अनेक
दावेदार आहेत. टीम इंडियामध्ये फलंदाजीत अनुभव व प्रतिभा असल्याचे दिसून येते तेथेच गोलंदाजीमध्ये थोडी अनुभवाची वानवा भासते. कृणाल व दीपक चाहर यांना वाशिंग्टन सुंदर व बुमराह दुखापतग्रस्त झाल्यामुळे ‘लकी ब्रेक’ मिळाला आहे आणि हे दोघेही सर्वोच्च पातळीवर आपली छाप सोडण्यास आतूर असतील.

Web Title:  Players' form must be of great importance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.