विराटला खेळताना पाहणे माझे सुदैव- एबी डिव्हिलियर्स

भारत आणि विश्व क्रिकेटमध्ये विराटसारखा खेळाडू विरळच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 03:22 AM2019-04-21T03:22:25+5:302019-04-21T03:22:47+5:30

whatsapp join usJoin us
My luck to play Virat - AB de Villiers | विराटला खेळताना पाहणे माझे सुदैव- एबी डिव्हिलियर्स

विराटला खेळताना पाहणे माझे सुदैव- एबी डिव्हिलियर्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

एबी डिव्हिलियर्स लिहितात..

आफ्रिकेत एक जुनी म्हण आहे. सर्वात उंच झाडावर सर्वाधिक हवेचा आनंद मिळतो. इडन गार्डनवर जी अटीतटीची लढत झाली त्यानंतर विराट कोहली आणि कुलदीप यादव यांना ही म्हण लागू होते. भारत आणि विश्व क्रिकेटमध्ये विराटसारखा खेळाडू विरळच. विराट एक सुपरस्टार फलंदाज आणि कर्णधार आहे. यादवने देखील अलिकडे खेळातील तिन्ही प्रकारात स्वत:चा ठसा उमटवला.

दोन्ही खेळाडूंना त्यांच्या वाट्याचा सन्मान लाभला यात दुमत नाही. विराटने कोलकाता येथे शानदार खेळी केली. डावाच्या पहिल्या चेंडूपासून अखेरपर्यंत खेळून शतक झळकवले शिवाय संघाचा विजय साकार केला. आम्ही अद्याप स्पर्धेबाहेर पडलो नाही. विराटने समजूतदारपणा दाखवून आधी डाव सावरला आणि नंतर धावसंख्येला आकार दिला. त्यावेळी मोईन अली हा देखील आक्रमक फटके मारत होता. अखेरच्या चार षटकात विराटने एका पाठोपाठ एक उत्कृष्ट शॉट मारून चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. १६ चेंडूत त्याने ४५ धावा कुटल्या. आरसीबीचे नेतृत्व करीत असलेला विराट साहस आणि कौशल्याचे दर्शन घडवत होता. त्याच्या प्रत्येक कृतीवर चाहत्यांची नजर असल्याने त्याची कामगिरीही अधिक उठून दिसते. त्याला सराव करताना, योजना आखताना, कामगिरी करताना पाहणे माझ्यासाठी सुदैवाची बाब ठरते. एक माणूस आणि क्रिकेटपटू म्हणून तो प्रशंसेस पात्र ठरतो.

सर्व फिरकीपटू भरपूर धावा मोजत असताना कुलदीप यादवने पाच चेंडूत २७ धावा मोजल्यानंतर सहाव्या चेंडूवर मोईन अलीला बाद केले. यावरुन २४ वर्षांचा हा खेळाडू चॅम्पियन ठरतो, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मनगटाचा जलद वापर तसेच चेंडूतील विविधता या बळावर त्याच्याकडून टाकला जाणारा चेंडू समजणे भल्याभल्यांना जमत नाही. चेंडू नेमका कसा वळण घेईल, हे समजण्यापलिकडे होऊन जाते. बळी घेण्याच्या प्रयत्नात कुलदीप चेंडू हवेत अधिक वेळ ठेवण्यास मागेपुढे पाहात नाही. माझ्यामते भारताच्या विश्वचषकाच्या मोहिमेत कुलदीपची भूमिका मोलाची ठरेल. कोलकाताविरुद्ध विजयामुळे आरसीबी संघ संयोजनात यशस्वी ठरला. मी देखील लवकर फिट होऊन रविवारी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.

Web Title: My luck to play Virat - AB de Villiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.