मुंबईची सामन्यावर मजबूत पकड,आंध्र प्रदेश बॅकफूटवर, शार्दुलने घेतले पाच बळी

मुंबई : रणजी ट्रॉफी स्पर्धेची बाद फेरी गाठण्यासाठी आंध्र प्रदेशविरुद्ध विजय आवश्यक असलेल्या सामन्यात मुंबईने तिसºया दिवसअखेर ३०७ धावांची आघाडी घेत मजबूत पकड मिळवली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 01:18 AM2017-11-20T01:18:16+5:302017-11-20T01:18:35+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai's strong grip on the match, Andhra Pradesh on the backfoot, and five wickets from Shardul | मुंबईची सामन्यावर मजबूत पकड,आंध्र प्रदेश बॅकफूटवर, शार्दुलने घेतले पाच बळी

मुंबईची सामन्यावर मजबूत पकड,आंध्र प्रदेश बॅकफूटवर, शार्दुलने घेतले पाच बळी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : रणजी ट्रॉफी स्पर्धेची बाद फेरी गाठण्यासाठी आंध्र प्रदेशविरुद्ध विजय आवश्यक असलेल्या सामन्यात मुंबईने तिसºया दिवसअखेर ३०७ धावांची आघाडी घेत मजबूत पकड मिळवली. शार्दुल ठाकूर आणि धवल कुलकर्णी यांच्या अचूकतेच्या जोरावर मुंबईने ११७ धावांची आघाडी घेतल्यानंतर श्रेयस अय्यरच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर पकड मिळवली.
सीएसआर शर्मा कॉलेज मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात मुंबईचा पहिला डाव ३३२ धावांमध्ये संपुष्टात आल्यानंतर यजमान आंध्र प्रदेशला २१५ धावांमध्ये गुंडाळून मुंबईने ११७ धावांची मोठी आघाडी मिळवत ३ गुण निश्चित केले. आंध्र प्रदेशने तिसºया दिवशी २ बाद ७४ धावा अशी सुरुवात केली होती. मात्र, हनुमा विहारी (७०) आणि रिकी भुई (६९) यांच्याव्यतिरिक्त त्यांच्या एकाही फलंदाजाला आपली चमक दाखवता आली नाही. त्याचवेळी, शार्दुलने भेदक मारा करताना आंध्र प्रदेशचा अर्धा संघ ५५ धावांमध्ये बाद करून मुंबईला पकड मिळवून दिली. धवलनेही त्याला चांगली साथ देताना ४४ धावांत ३ बळी घेत यजमानांची कोंडी केली.
यानंतर दुसºया डावाची सुरुवात केलेल्या मुंबईला लवकरच झटका बसला. पहिल्या डावातील शतकवीर पृथ्वी शॉ (२१) आणि जय बिस्त (३६) ही सलामी जोडी लवकर बाद झाली. यानंतर अनुभवी श्रेयस अय्यरने (७५*) सूत्रे आपल्याकडे घेत सूर्यकुमार यादवसह (३३) मुंबईला सावरले. या दोघांनी ६२ धावांची भागीदारी केली. अय्याप्पा बंदारुने सूर्यकुमारला बाद करून ही जोडी फोडली. काही वेळाने सिद्धेश लाडही (२२) परतल्याने मुंबईचा डाव ४ बाद १७९ असा घसरला. तिसरा दिवसाचा खेळ थांबला तेव्हा श्रेयससह कर्णधार आदित्य तरे (१*) नाबाद राहिले होते.
>गुरूंना दिलेला
शब्द खरा केला
गेल्या काही सामन्यांपासून लौकिकास साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरत असलेल्या शार्दुल ठाकूरने रविवारी ५ बळी घेत मुंबईसाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. परंतु, खेळ सुरू होण्याआधी त्याने आपले प्रशिक्षक दिनेश लाड यांच्याशी संपर्क साधला होता. त्या वेळी लाड यांनी ‘मला ५ बळी हवे आहेत’, असे म्हटले. त्यावर शार्दुलने ‘आज घेतो ५ बळी’, असे म्हटले आणि आपल्या प्रशिक्षकांना दिलेला शब्द त्याने अचूकपणे पाळला. शार्दुलच्या कामगिरीचा मला खूप अभिमान आहे.
>संक्षिप्त धावफलक :
मुंबई (पहिला डाव) : १३२ षटकात सर्वबाद ३३२ धावा. आणि दुसरा डाव : ४१ षटकात ४ बाद १९० धावा (श्रेयस अय्यर खेळत आहे ७५, जय बिस्त ३६, सूर्यकुमार यादव ३३, आदित्य तरे खेळत आहे १; केव्ही शशिकांत १/३३, भार्गव भट्ट १/३७, अय्याप्पा बंदारु १/७२)
आंध्र प्रदेश (पहिला डाव) : ७७ षटकात सर्वबाद २१५ धावा (हनुमा विहारी ७०, रिकी भुई ६९; शार्दुल ठाकूर ५/५५, धवल कुलकर्णी ३/४४)

Web Title: Mumbai's strong grip on the match, Andhra Pradesh on the backfoot, and five wickets from Shardul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.