आरसीबीविरुद्ध विजय मिळवण्यास मुंबई इंडियन्स प्रयत्नशील

पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असलेला मुंबई इंडियन्स संघ मंगळवारी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या मजबूत संघाविरुद्ध खाते उघडण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 03:11 AM2018-04-17T03:11:53+5:302018-04-17T03:11:53+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai Indians try to win against RCB | आरसीबीविरुद्ध विजय मिळवण्यास मुंबई इंडियन्स प्रयत्नशील

आरसीबीविरुद्ध विजय मिळवण्यास मुंबई इंडियन्स प्रयत्नशील

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असलेला मुंबई इंडियन्स संघ मंगळवारी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या मजबूत संघाविरुद्ध खाते उघडण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.
उभय संघात आक्रमक फलंदाजांचा भरणा आहे; पण दोन्ही संघांची सुरुवात चांगली झालेली नाही. वानखेडे स्टेडियममध्ये दोन्ही संघ विजयासह लय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतील. मुंबईने तिन्ही सामने डेथओव्हर्समध्ये गमावले, तर आरसीबी संघाला तीन सामन्यांत केवळ एक विजय मिळवता आला.
येथे आतापर्यंत खेळले गेलेले दोन्ही सामने रंगतदार झाले. दोन्ही लढतींत यजमान संघाला विजयाची संधी होती; पण चेन्नई सुपरकिंग्स व दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध अखेरच्या क्षणी संघ पिछाडीवर पडला.
मुंबई संघाला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्यांच्या मैदानावरही पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील तीनदा जेतेपद पटकावणारा संघ अखेरच्या स्थानी आहे.
आरसीबीने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभवाने सुरुवात केली आणि त्यानंतर किंग्स इलेव्हन पंजाबला पराभूत केले. पण रविवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध आपल्याच मैदानावर त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
पंजाबविरुद्ध एका षटकात तीन बळी घेणारा आरसीबीचा उमेश यादव रॉयल्सविरुद्धच्या लढतीत महागडा ठरला. त्यामुळे रॉयल्स संघाने यंदाच्या मोसमातील सर्वोच्च २१७ धावांची मजल मारली. संजू सॅमसनने ४५ चेंडूंना सामोरे जाताना नाबाद ९२ धावा फटकावल्या. आरसीबीच्या गोलंदाजांना आपल्या कामगिरीत सुधारणा करावी लागेल. कारण मुंबई संघात काही दिग्गज फलंदाजांचा समावेश आहे. मुंबई संघ दिल्लीविरुद्धच्या लढतीत दोनशेच्या आसपास मजल मारण्यात यशस्वी ठरला होता. रॉयल्सविरुद्ध लेगस्पिनर चहलचा (२-२२) अपवाद वगळता आरसीबीचे अन्य सर्व गोलंदाज अपयशी ठरले. संघातर्फे कर्णधार विराट कोहलीने ५७ धावांची सकारात्मक खेळी केली.

सामन्याची वेळ : रात्री ८ वाजता
स्थळ : वानखेडे स्टेडियम, मुंबई

Web Title: Mumbai Indians try to win against RCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.