मोठे स्पेल टाकण्यामुळे मदत मिळेल : शमी

भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध तिसºया व अखेरच्या कसोटी सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला आतापर्यंत १३० षटके गोलंदाजी केलेली आहे, पण वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या मते गोलंदाजांची फिटनेससाठी ही चांगली बाब..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 05:15 AM2017-12-05T05:15:03+5:302017-12-05T05:15:24+5:30

whatsapp join usJoin us
Large spellings will help: Shami | मोठे स्पेल टाकण्यामुळे मदत मिळेल : शमी

मोठे स्पेल टाकण्यामुळे मदत मिळेल : शमी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध तिसºया व अखेरच्या कसोटी सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला आतापर्यंत १३० षटके गोलंदाजी केलेली आहे, पण वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या मते गोलंदाजांची फिटनेससाठी ही चांगली बाब असून मोठे स्पेल टाकल्यामुळे फिटनेसची चाचणी घेता येईल.
आतापर्यंत २४ षटके गोलंदाजी करणारा शमी तिसºया दिवसाच्या खेळानंतर पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाला,‘गेल्या दोन लढतींच्या तुलनेत ही खेळपट्टी वेगळी आहे. आम्हाला अपेक्षित असलेली खेळपट्टी मिळालेली नाही, पण आम्हाला कसून मेहनत करण्याची व चांगला सराव करण्याची संधी मिळाली आहे. आम्हाला मोठे स्पेल टाकण्याची संधी मिळाली. त्यामुळे फिटनेसची चाचणी घेता आली. आम्ही १०० पेक्षा अधिक षटके क्षेत्ररक्षण केलेले आहे. त्यामुळे आमचा फिटनेसचा दर्जा सिद्ध होतो.’
७४ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेणारा शमी म्हणाला,‘वेगवान गोलंदाज असल्यामुळे विशेषता भारतात आम्हाला अधिक गोलंदाजी करण्याची संधी मिळत नाही. वेगवान गोलंदाज मोठा स्पेल टाकत असल्याचे दृश्य अभावानेच बघायला मिळते. आम्हाला सुरुवातीला १२-१४ षटके गोलंदाजी करण्याची संधी मिळत होती, पण गेल्या एक-दीड वर्षांत २०-२५ षटके टाकण्याची संधी मिळत आहे. अधिक गोलंदाजी केल्यामुळे कामगिरीत सुधारणा करता येते.’
फिरोजशाह कोटला मैदानावर सामन्यादरम्यान प्रदूषण वाढत असल्याचा मुद्दा चर्चेत आहे, पण शमीच्या मते वस्तुस्थिती तेवढी खराब नाही जेवढा दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. शमी म्हणाला,‘मला सर्दीचा त्रास होताच. प्रदूषण अडचणीचा मुद्दा आहे, पण जेवढा दाखविण्यात येत आहे तेवढा नक्कीच नाही. कदाचित आम्हाला याची सवय असावी.’ भारतीय क्षेत्ररक्षकांनी श्रीलंकेच्या डावात अनेक झेल सोडले. कर्णधार विराट कोहली, शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्यासारख्या खेळाडूंना झेल टिपण्यात अपयश आले. दक्षिण आफ्रिका दौºयापूर्वी हा संघासाठी चिंतेचा विषय असला तरी शमीने मात्र याला अधिक महत्त्व दिले नाही. शमी म्हणाला,‘झेल सुटणे हा खेळाचा एक भाग आहे. क्षेत्ररक्षकही मानवच आहे. ते काही मशिन नाही. झेल सुटला तर राग तर येतो, पण संघ म्हणून जेवढे दुर्लक्ष केले तेवढे चांगले असते.’ रिव्हर्स स्विंग होत नसून चेंडू थांबून येत असल्याचे शमीने एका उत्तरात सांगितले. (वृत्तसंस्था)

Web Title: Large spellings will help: Shami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.