तिसऱ्या कसोटीसाठी कुलदीप, अक्षरमध्ये स्पर्धा

स्टार अष्टपैलू रविंद्र जडेजाला याच्यावर श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी बंदी लावण्यात आल्यानंतर त्याच्याजागी अक्षर पटेलचा संघात समावेश करण्यात आला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 01:57 AM2017-08-10T01:57:48+5:302017-08-10T01:58:25+5:30

whatsapp join usJoin us
Kuldeep for the third Test, the competition in the letter | तिसऱ्या कसोटीसाठी कुलदीप, अक्षरमध्ये स्पर्धा

तिसऱ्या कसोटीसाठी कुलदीप, अक्षरमध्ये स्पर्धा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलंबो : स्टार अष्टपैलू रविंद्र जडेजाला याच्यावर श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी बंदी लावण्यात आल्यानंतर त्याच्याजागी अक्षर पटेलचा संघात समावेश करण्यात आला. यामुळे अंतिम संघात स्थान मिळवण्यासाठी आता चायनामन गोलंदाज कुलदीप यादव आणि अक्षर यांच्या मोठी स्पर्धा असेल. भलेही संघासोबत जुळण्यासाठी अक्षरला बोलाविण्यात आले असले तरी, गेल्या काही सामन्यांतून प्रभावशाली कामगिरी केलेल्या कुलदीपला अंतिम संघात संधी मिळेल अशी चर्चा आहे. दौºयाच्या सुरुवातीपासूनच तो तिसरा फिरकीपटू म्हणून संघासोबत आहे.
आपल्या निवडीच्या शक्यतेबाबत कुलदीप म्हणाला की, ‘नक्कीच मी खूप उत्साहित आहे. माझ्या पदार्पणाच्या कसोटी सामन्याविषयी देखील मी उत्साहित होतो. त्यामुळेच श्रीलंकेत खेळण्याची मला संधी मिळाली तर मोठी आनंदाची बाब असेल. कारण, यारुपाने मला माझ्या मेहनतीचे फळ मिळेल. तसेच, मी काहीसा नर्व्हसदेखील असेल, कारण चांगली कामगिरी करण्याचे आव्हान माझ्यापुढे असेल.’
त्याचप्रमाणे, ‘मी अंतिम संघातून खेळेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, कारण सामना सुरु होण्यास अजून तीन दिवस शिल्लक आहेत. मात्र, जेव्हा पासून येथे आलोय, तेव्हापासून शास्त्री सर माझा आत्मविश्वास वाढवत आहेत. मी सातत्याने सराव करत असून, पहिल्या कसोटीपुर्वीपासूनच शास्त्री सर माझ्याशी चर्चा करत आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Kuldeep for the third Test, the competition in the letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.