कोहलीची अद्याप खरी परीक्षा झाली नाही : दादा

टीम इंडियाने गाले कसोटीत यजमान श्रीलंकेचा ३०४ धावांनी पराभव केला, पण माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या मते विराट कोहलीची कर्णधार म्हणून अद्याप खरी परीक्षा झालेली नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 02:29 AM2017-07-31T02:29:22+5:302017-07-31T02:29:44+5:30

whatsapp join usJoin us
kaohalaicai-adayaapa-kharai-paraikasaa-jhaalai-naahai-daadaa | कोहलीची अद्याप खरी परीक्षा झाली नाही : दादा

कोहलीची अद्याप खरी परीक्षा झाली नाही : दादा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : टीम इंडियाने गाले कसोटीत यजमान श्रीलंकेचा ३०४ धावांनी पराभव केला, पण माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या मते विराट कोहलीची कर्णधार म्हणून अद्याप खरी परीक्षा झालेली नाही. कोहलीने गाले कसोटीच्या दुसºया डावात कारकिर्दीतील १७ वे शतक झळकावले आहे. भारतापुढे आव्हान निर्माण करण्यालायक श्रीलंका संघ दिसत नसल्याचे गांगुलीने म्हटले आहे.
गांगुली म्हणाला, ‘भारतीय संघ फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या विभागात समतोल आहे, तर याउलट श्रीलंका संघाला अनेक बाबतीत चिंता करण्याची गरज आहे. गेल्या दोन वर्षांत भारतीय संघाची कामगिरी (विशेषत: मायदेशात) उल्लेखनीय ठरली आहे.
अनिल कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली भारताने सुरुवातीला वेस्ट इंडीज आणि त्यानंतर मायदेशात चमकदार कामगिरी केली. अशा स्थितीत या दौºयात भारतीय संघाला खºया अर्थाने आव्हान मिळण्याची शक्यता नाही.’
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवला असला, तरी गांगुलीच्या मते कोहलीची खरी परीक्षा उपखंडाबाहेरच्या कसोटी मालिकेत होईल.
आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत विराट कोहलीची कामगिरी चांगली नव्हती. याबाबत बोलताना गांगुली म्हणाला,‘एका मालिकेवरुन फलंदाजाच्या कामगिरीचे आकलन करणे चुकीचे आहे. जर तुम्ही वेस्ट इंडिजमधील वन-डे सामन्यांची मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील कामगिरीचा विचार केला तर विराट शानदार फॉर्मात असल्याचे दिसून येईल.’ (वृत्तसंस्था)

Web Title: kaohalaicai-adayaapa-kharai-paraikasaa-jhaalai-naahai-daadaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.