वेगवान गोलंदाजीमध्ये भारताकडे बरेच पर्याय- झहीर खान

भारतीय निवड समितीने पहिल्या तीन कसोटी सामन्यांसाठी बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव व शार्दुल ठाकूर यांची संघात निवड केली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 01:11 AM2018-07-23T01:11:42+5:302018-07-23T07:09:24+5:30

whatsapp join usJoin us
India has many options in fast bowlers - Zaheer Khan | वेगवान गोलंदाजीमध्ये भारताकडे बरेच पर्याय- झहीर खान

वेगवान गोलंदाजीमध्ये भारताकडे बरेच पर्याय- झहीर खान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार व जसप्रीत बुमराह यांची उणीव भरून काढण्यासाठी भारताकडे मजबूत पर्याय (बेंच स्ट्रेंथ) आहे, असे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने व्यक्त केले. हे दोन्ही वेगवान गोलंदाज इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या आगामी कसोटी मालिकेतील काही सामने खेळू शकणार नाही.

भारतीय निवड समितीने पहिल्या तीन कसोटी सामन्यांसाठी ईशांत शर्मा, बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव व शार्दुल ठाकूर यांची संघात निवड केली आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्याही संघात आहे.

वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेदरम्यान अनफिट असलेला बुमराह दुसऱ्या कसोटी सामन्यापासून निवडीसाठी उपलब्ध राहील, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना १ आॅगस्टपासून बर्मिंघममध्ये खेळल्या जाणार आहे.

झहीर म्हणाला,‘बुमराह पहिल्या काही सामन्यांना मुकणार आहे आणि भुवनेश्वर कुमारही दुखापग्रस्त आहे. आगामी सत्राचा विचार करता ही चिंतेची बाब आहे. पण, माझ्या मते त्यांच्या दुखापतीनंतरही पाच सामन्यांची मालिका मोठी मालिका आहे.’
झहीर पुढे म्हणाला,‘माझ्या मते जे गोलंदाज खेळले उदा. उमेश यादव चांगली कामगिरी करीत आहे. ईशांत सिनिअर गोलंदाज असून त्याने नेतृत्व करायला हवे. मोहम्मद शमीची कामगिरी चांगली आहे. माझ्या मते भुवनेश्वर व बुमराहची उणीव भासेल तर भारताकडे बेंच स्ट्रेंथ मजबूत आहे.’ 
गेल्या अनेक वर्षात भारताचे हे सर्वांत संतुलित वेगवान गोलंदाजी आक्रमण असल्याचे मत व्यक्त करणाºया सचिन तेंडुलकरच्या मताशी झहीरने सहमती दर्शवली.

Web Title: India has many options in fast bowlers - Zaheer Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.