अंकितच्या खेळीने भारत अ संघाची पकड मजबूत, न्यूझीलंडच्या दुसºया डावात १ बाद १०४ धावा

महाराष्ट्राचा शैलीदार फलंदाज अंकित बावणे याच्या नाबाद १६२ धावांच्या शानदार खेळीच्या बळावर भारत अ संघाने सोमवारी न्यूझीलंड अ संघाविरुद्ध दुस-या अनधिकृत क्रिकेट कसोटी सामन्यात आपली पकड मजबूत केली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 02:48 AM2017-10-03T02:48:12+5:302017-10-03T02:48:21+5:30

whatsapp join usJoin us
India A consolidated their grip with an unbeaten knock, New Zealand made 104 for one in their second innings | अंकितच्या खेळीने भारत अ संघाची पकड मजबूत, न्यूझीलंडच्या दुसºया डावात १ बाद १०४ धावा

अंकितच्या खेळीने भारत अ संघाची पकड मजबूत, न्यूझीलंडच्या दुसºया डावात १ बाद १०४ धावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

विजयवाडा : महाराष्ट्राचा शैलीदार फलंदाज अंकित बावणे याच्या नाबाद १६२ धावांच्या शानदार खेळीच्या बळावर भारत अ संघाने सोमवारी न्यूझीलंड अ संघाविरुद्ध दुस-या अनधिकृत क्रिकेट कसोटी सामन्यात आपली पकड मजबूत केली. अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंड अ संघाने दिवसअखेर १ बाद १०४ धावा केल्या.
जीत रावल ४१, तर कर्णधार हेन्री निकोल्स ५५ धावांवर खेळत आहेत. या दोघांनी दुसºया गड्यासाठी नाबाद ८५ धावांची भागीदारी केली. आता न्यूझीलंड अ संघाला डावाने पराभव टाळण्यासाठी अद्याप १३२ धावांची गरज असून, त्यांचे ९ फलंदाज बाकी आहेत. भारत अ कडून शाहबाज नदीम याने २६ धावांत १ गडी बाद केला. त्याआधी अंकित बावणेच्या सुरेख खेळीमुळे भारत अ संघाला न्यूझीलंड अ संघाविरुद्ध पहिल्या डावात २३६ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेण्यात यश मिळवले. अंकित बावणे २४५ चेंडूंना सामोरे जाताना २१ चौकार आणि ५ षटकार ठोकले आणि पार्थिव पटेल याच्या साथीने पाचव्या गड्यासाठी १६६ धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारत अ संघाला पहिल्या डावात ४४७ धावापर्यंत मजल मारता आली.

संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड अ : पहिला डाव २११ आणि दुसरा डाव १ बाद १०४.
(हेन्री निकोल्स खेळत आहे ५५, जीत रावल खेळत आहे ४१).
भारत अ : पहिला डाव : ११० षटकांत सर्व बाद ४४७. (अंकित बावणे नाबाद १६२, श्रेयस अय्यर ८२, पार्थिव पटेल ६५, ईश सोढी ३/१२०, मुन्रो २/२४).

Web Title: India A consolidated their grip with an unbeaten knock, New Zealand made 104 for one in their second innings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.