हनुमा, अंकितने भारत ‘अ’ संघाला सावरले

झुंजार खेळीच्या जोरावर भारत अ संघाने दक्षिण आफ्रिका ‘अ’ विरुद्ध दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ४ बाद ३२२ धावा केल्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 03:08 AM2018-08-11T03:08:54+5:302018-08-11T03:08:57+5:30

whatsapp join usJoin us
Hanuma, Ankita got the better of India 'A' team | हनुमा, अंकितने भारत ‘अ’ संघाला सावरले

हनुमा, अंकितने भारत ‘अ’ संघाला सावरले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बंगळुरू : सुरुवातीच्या धक्क्यातून सावरताना हनुमा विहारीचे नाबाद शतक व अंकित बावणेची ८० धावांच्या झुंजार खेळीच्या जोरावर भारत अ संघाने दक्षिण आफ्रिका ‘अ’ विरुद्ध दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ४ बाद ३२२ धावा केल्या.
भारत अ संघाकडून हनुमा विहारी याने २७३ चेंडूंत १३ चौकारांसह नाबाद १३८ धावा केल्या, तर त्याला साथ देणाºया शैलीदार फलंदाज अंकित बावणे याने १४६ चेंडूंत १० चौकार व एका षटकारासह ८० धावांची खेळी सजवली. कर्णधार श्रेयस अय्यरने ७२ चेंडूंत ६ चौकारांसह ३९ धावा केल्या. पण त्याला मोठी खेळी करण्यात यश आले नाही. श्रीकर भरत ५१ चेंडूत ४ चौकारांसह ३० धावांवर खेळत आहे.
>संक्षिप्त धावफलक
भारत अ (पहिला डाव) : ९० षटकांत ४ बाद ३२२. (हनुमा विहारी खेळत आहे १३८, अंकित बावणे ८०, श्रेयस अय्यर ३९, श्रीकर भरत खेळत आहे ३०. डॅन पी. १/४६, एस. मुथुसमी १/५१.)

Web Title: Hanuma, Ankita got the better of India 'A' team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.