कोहलीबरोबर मैत्री राजकीय संबंधावर अवलंबून नाही- शाहिद आफ्रिदी

भारत-पाकिस्तानदरम्यान सीमारेषेवर सुरू असलेल्या तणावाचा दोन्ही देशांतील क्रिकेटशी निगडित संबंधावर परिणाम होत असला तरी शाहिद आफ्रिदीने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत असलेल्या त्याच्या मैत्रीपूर्ण संबंधावर राजकीय परिस्थितीचा परिणाम होऊ शकत नसल्याचे सांगितले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 02:52 AM2018-02-11T02:52:00+5:302018-02-11T02:52:10+5:30

whatsapp join usJoin us
Friendship with Kohli is not dependent on political relation - Shahid Afridi | कोहलीबरोबर मैत्री राजकीय संबंधावर अवलंबून नाही- शाहिद आफ्रिदी

कोहलीबरोबर मैत्री राजकीय संबंधावर अवलंबून नाही- शाहिद आफ्रिदी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सेंट मॉरित्ज (स्वित्झर्लंड) : भारत-पाकिस्तानदरम्यान सीमारेषेवर सुरू असलेल्या तणावाचा दोन्ही देशांतील क्रिकेटशी निगडित
संबंधावर परिणाम होत असला तरी शाहिद आफ्रिदीने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत असलेल्या त्याच्या मैत्रीपूर्ण
संबंधावर राजकीय परिस्थितीचा परिणाम होऊ शकत नसल्याचे सांगितले.
पाकिस्तानचा हा स्फोटक फलंदाज आफ्रिदी म्हणाला की, ‘विराटसोबत माझे संबंध राजकीय परिस्थितीवर अवलंबून नाहीत. विराट एक चांगली व्यक्ती आहे. माझ्याप्रमाणेच तोही त्याच्या देशाचा क्रिकेटचा दूत आहे.’ कोहली आपल्याला नेहमीच जास्त सन्मान देतो, असे आफ्रिदीने म्हटले.

एक क्रिकेटर म्हणून दोन जणांतील संबंधामुळे दोन्ही देशांतील संबंध कसे असायला हवेत हे या उदाहरणाने आम्ही निश्चित करू शकतो, असे मी मानतो. पाकिस्ताननंतर त्याला भारत आणि आॅस्ट्रेलियातून सर्वात जास्त प्रेम आणि सन्मान मिळाला, असे मला वाटते.
- शाहिद आफ्रिदी
पाकिस्तानचा माजी कर्णधार

Web Title: Friendship with Kohli is not dependent on political relation - Shahid Afridi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.