छोट्या दुखापतींचा सामना करीत आहे

‘सध्या क्रिकेटपासून दूर असून सुटीचा आनंद घेत आहे. त्याचवेळी, मला काही छोट्या दुखापतींचाही सामना करावा लागत आहे. पण यातून मी लवकरच सावरेल,’ असा विश्वास भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याने व्यक्त केला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 04:23 AM2018-03-14T04:23:29+5:302018-03-14T04:23:29+5:30

whatsapp join usJoin us
Facing minor injuries | छोट्या दुखापतींचा सामना करीत आहे

छोट्या दुखापतींचा सामना करीत आहे

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : ‘सध्या क्रिकेटपासून दूर असून सुटीचा आनंद घेत आहे. त्याचवेळी, मला काही छोट्या दुखापतींचाही सामना करावा लागत आहे. पण यातून मी लवकरच सावरेल,’ असा विश्वास भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याने व्यक्त केला.
मंगळवारी मुंबईत झालेल्या या एका कार्यक्रमादरम्यान कोहली म्हणाला, ‘आपण आपल्या शरीराचा सन्मान करायला पाहिजे. शारीरिक क्षमतेनुसार खेळले गेले पाहिजे. अतिरिक्त ताण देऊन खेळल्यास त्याचा परिणाम नक्कीच आरोग्यावर होऊ शकतो. सध्या मी काही लहान दुखापतींतून सावरत असून माझे शरीर सकारात्मक प्रतिसाद देत आहे.’ त्याचप्रमाणे सध्या सुटीचा आनंद घेत असल्याचे सांगताना कोहली म्हणाला, ‘सातत्याने क्रिकेट खेळल्याने काही वेळ शारीरिक विश्रांतीची आवश्यकता होती. सध्या या विश्रांतीकाळाचा आनंद घेत आहे.’
श्रीलंकेत सुरू असलेल्या तिरंगी टी-२० मालिकेतील भारतीय
संघाच्या कामगिरीविषयी समाधान व्यक्त करताना कोहली म्हणाला,
‘मी सध्या सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील भारतीय संघाच्या कामगिरीवर नजर ठेवून आहे.
संघातील युवा खेळाडूंनी चांगला खेळ केला आहे. खरं म्हणजे संघ
खेळत असताना मलाही मैदानात जाण्याची खूप इच्छा होत आहे.
पण शरीराला विश्रांतीची गरज असल्याने इच्छा असूनही
मला खेळापासून दूर राहावे लागत आहे.’
दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर हा आपला आदर्श आणि आवडता खेळाडू असल्याचे सांगताना कोहली म्हणाला, ‘फेडरर सर्वोत्तम आहे. त्याचा खेळ कायम प्रेरणादायी असतो. ज्या प्रकारे टीकाकारांना गप्प करत त्याने वयाच्या ३६ व्या वर्षी ग्रँडस्लॅम जिंकले, ते अद्भुत होते. फेडररचा मी सन्मान करतो.’
लवकरच मी पूर्णपणे तंदुरुस्त आणि ताजातवाना होऊन आगामी आयपीएल सत्रामध्ये खेळेल. शिवाय आयपीएलनंतर अनेक स्पर्धा खेळायच्या असल्याने या विश्रांतीचा खूप फायदा होईल. - विराट कोहली

Web Title: Facing minor injuries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.