...त्या आव्हानाचा आनंद घेत आहे - वृद्धिमान साहा

फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर चेंडूला अधिक उसळी मिळत असेल तर यष्टिरक्षण करणे आव्हान असते. पण अशा खेळपट्टीवर रवींद्र जडेजा व रविचंद्रन आश्विन यांच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षण करण्याचे आव्हान आनंदाने पेलण्यास भारतीय यष्टिरक्षक वृद्धिमान साहा सज्ज असतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 02:21 AM2017-08-08T02:21:29+5:302017-08-08T02:22:02+5:30

whatsapp join usJoin us
 ... enjoying that challenge - be supportive | ...त्या आव्हानाचा आनंद घेत आहे - वृद्धिमान साहा

...त्या आव्हानाचा आनंद घेत आहे - वृद्धिमान साहा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलंबो : फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर चेंडूला अधिक उसळी मिळत असेल तर यष्टिरक्षण करणे आव्हान असते. पण अशा खेळपट्टीवर रवींद्र जडेजा व रविचंद्रन आश्विन यांच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षण करण्याचे आव्हान आनंदाने पेलण्यास भारतीय यष्टिरक्षक वृद्धिमान साहा सज्ज असतो.
आश्विन व जडेजा यांनी फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर वर्चस्व गाजवताना भारताला श्रीलंकेविरुद्ध दुसºया कसोटी सामन्यात एक डाव ५३ धावांनी विजय मिळवून दिला.
‘अशा खेळपट्ट्यांवर आश्विन व जडेजा यांच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षण करताना आनंद मिळतो. जास्तीत जास्त चेंडू यष्टिरक्षकाकडे येत असतील तर मजा येते. काही खेळपट्ट्यांवर दिवसामध्ये केवळ १०-१२ चेंडूच यष्टिरक्षकाकडे येत असतात. तुमच्याकडे जर जास्तीत-जास्त चेंडू येत असतील तर तुम्ही नेहमी एकाग्र असता, असे साहाने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
साहा म्हणाला, ‘बाऊंससोबत जुळवून घेण्यासाठी तुम्हाला थोडे आधी पोझिशनमध्ये यावे लागते. यष्टिरक्षण करताना चेंडूच्या उसळीसोबत शरीराच्या हालचाली होणे आवश्यक असल्याचे मी सुरुवातीपासून शिकत आहो. या खेळपट्टीवर चेंडूला अधिक उसळी मिळत असल्यामुळे मी थोडा बदल केला आणि लवकर पोझिशनमध्ये येत होतो.’
साहा याने दुसºया कसोटी सामन्याच्या दुसºया डावात दोन शानदार झेल टिपताना कुसाल मेंडिस व अँजेलो मॅथ्यूज यांना तंबूचा मार्ग दाखविला.
साहा म्हणाला, ‘चेंडूने मेंडिसच्या बॅटची आतील कड घेतली त्या वेळी तो क्लीन बोल्ड होईल, असे मला वाटले होते; पण चेंडू पॅडवर आदळून उंच उडाला. वेग कमी असल्यामुळे मला चेंडूपर्यंत पोहचण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळाला आणि सूर मारत झेल टिपता आला.’
साहा पुढे म्हणाला, ‘ही खेळपट्टी चांगली होती. यापेक्षा कठीण खेळपट्टीवर माझा आत्मविश्वास उंचावला आहे. मॅथ्यूजचा झेल माझ्या हातात आल्यामुळे मी स्वत:ला नशीबवान समजतो. तो झेल अजिंक्य रहाणेच्या डोक्यावरून गेला असता, पण तो माझ्या हातात फसला.’
आपल्या सर्वोत्तम झेलपैकी बोलताना साहा म्हणाला, ‘माझ्या मते पुणेमध्ये स्टीव्ह ओकीफी (२०१५), बेंगळुरूमध्ये एबी डिव्हिलियर्स (२०१५) आणि बेंगळुरूमध्ये मॅथ्यू वेड (२०१७) हे माझ्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम झेल आहेत.’ (वृत्तसंस्था)

साहा पुढे म्हणाला, ‘माझे बालपणीचे प्रशिक्षक जयंता भौमिक सांगायचे की, जर तू चांगली कामगिरी केली तर तुझ्या नावाचा निवडीसाठी नक्कीच विचार होईल. केवळ स्वत:साठी न खेळता संघासाठी खेळ, असा ते नेहमी सल्ला द्यायचे. मी त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतो.’ श्रीलंकेविरुद्धचा तिसरा कसोटी सामना त्याचा १०० वा प्रथम-श्रेणी सामना असल्याची साहाला कल्पना नव्हती.

साहा म्हणाला, ‘मला केवळ तो माझा १०० वा प्रथम श्रेणी सामना असल्याची माहिती मिळाली आहे. याची मला यापूर्वी कल्पना नव्हती. ही मोठी उपलब्धी आहे, पण मी प्रदीर्घ काळ खेळण्यास उत्सुक आहे.’
श्रीलंकेचा सफाय करण्याबाबत छेडले असता साहा म्हणाला, ‘आम्ही त्याचा विचार करीत नाही. आम्ही प्रत्येक लढतीत चांगली कामगिरी करण्यासाठी इच्छुक असतो. आम्ही मालिकेत सध्या २-० ने आघाडीवर असून, तिसºया लढतीतही कामगिरी सातत्य राखण्यास प्रयत्नशील आहोत.’

स्लेजिंग आवश्यक नाही

यष्टिरक्षण करताना साहा याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने निर्माण केलेला आदर्श कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. धोनीचा स्लेजिंगवर कधीच विश्वास नव्हता, असे सांगताना साहा याने आपणही कधीच स्लेजिंगचा मार्ग निवडणार नसल्याचे स्पष्ट केले. स्लेजिंग आवश्यक नसल्याचे साहा म्हणाला. जागतिक क्रिकेटमध्ये मात्र स्लेजिंगविना यष्टिरक्षण ही गोष्टच पचनी पडत नाही.

साहा म्हणाला, ‘एम. एस. धोनीने कधी स्लेजिंग केल्याचे मी बघितले नाही. त्यामुळे स्लेजिंग आवश्यक नाही. प्रतिस्पर्धी फलंदाजाला गुंगारा देण्यासाठी तुम्ही त्याला वेगळे वळण देऊ शकता. जसे खेळपट्टी खराब आहे किंवा तू चुकीचा फटका खेळला, असे म्हणता येईल. ते स्वीकाहार्य आहे. ’
यष्टिरक्षणामध्ये साहा आॅस्ट्रेलियाच्या अ‍ॅडम गिलख्रिस्टला आदर्श मानतो. साहा म्हणाला, ‘मला बालपणापासून गिलख्रिस्टची फलंदाजी व यष्टिरक्षण आवडते. मी त्याला आदर्श यष्टिरक्षक मानतो. मार्क बाउचर व इयान हिली हे यष्टिरक्षकही चांगले होते; पण गिलख्रिस्ट माझा आवडीचा यष्टिरक्षक आहे.’

Web Title:  ... enjoying that challenge - be supportive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.