चौधरी म्हणतात, ‘तो मी नव्हेच...’

‘दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशांसह संबंध संपुष्टात आणायला हवे, असे आयसीसी व सदस्य देशांना आवाहन करणाऱ्या बीसीसीआयच्या पत्रासोबत माझा काही संबंध नाही,’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 04:08 AM2019-03-05T04:08:40+5:302019-03-05T04:08:44+5:30

whatsapp join usJoin us
Choudhary says, 'I am not ...' | चौधरी म्हणतात, ‘तो मी नव्हेच...’

चौधरी म्हणतात, ‘तो मी नव्हेच...’

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : ‘दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशांसह संबंध संपुष्टात आणायला हवे, असे आयसीसी व सदस्य देशांना आवाहन करणाऱ्या बीसीसीआयच्या पत्रासोबत माझा काही संबंध नाही,’ असे बीसीसीआयचे कार्यवाहक सचिव अमिताभ चौधरी यांनी म्हटले. तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मात्र बीसीसीआयची पाकविरुद्ध न खेळण्याची विनंती फेटाळून लावत या प्रकरणात आमची कुठली भूमिका नसल्याचे स्पष्ट केले आहे. पत्रकार परिषदेमध्ये चौधरी यांना पत्रात पाकच्या नावाचा उल्लेख न करणे चूक होते का, असे विचारले असता ते म्हणाले, ‘ते पत्र मी लिहिलेच नाही.’ पुलवामा दहशतावदी हल्ल्यानंतर हे पत्र प्रशासकांच्या समितीसह (सीओए) राहुल जोहरी यांनी सीओएसह चर्चा केल्यानंतर लिहिले होते.

Web Title: Choudhary says, 'I am not ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.