सी. के. नायडू यांच्या आठवणींना दिला उजाळा; माधव आपटे, नरी काँट्रॅक्टर यांनी करून दिली आठवण

माधव आपटे आणि नरी काँट्रॅक्टर या माजी दिग्गज कसोटी फलंदाजाने भारताचे पहिले कर्णधार सी. के. नायडू यांच्या १२२व्या जयंतीनिमित्त मंगळवारी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. नायडू यांच्या अनेक आठवणी सांगतानाच, त्यांनी भारतीय क्रिकेटमध्ये दिलेल्या अमूल्य योगदानाची आठवण या वेळी दिग्गजांनी करून दिली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:44 AM2017-11-01T00:44:52+5:302017-11-01T00:45:02+5:30

whatsapp join usJoin us
C. K. Naidu's memories shine; Recalled by Madhav Apte, Nari Contractor | सी. के. नायडू यांच्या आठवणींना दिला उजाळा; माधव आपटे, नरी काँट्रॅक्टर यांनी करून दिली आठवण

सी. के. नायडू यांच्या आठवणींना दिला उजाळा; माधव आपटे, नरी काँट्रॅक्टर यांनी करून दिली आठवण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : माधव आपटे आणि नरी काँट्रॅक्टर या माजी दिग्गज कसोटी फलंदाजाने भारताचे पहिले कर्णधार सी. के. नायडू यांच्या १२२व्या जयंतीनिमित्त मंगळवारी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. नायडू यांच्या अनेक आठवणी सांगतानाच, त्यांनी भारतीय क्रिकेटमध्ये दिलेल्या अमूल्य योगदानाची आठवण या वेळी दिग्गजांनी करून दिली.
३१ आॅक्टोबर १८९५ रोजी जन्मलेल्या नायडू यांच्यावर आधारित ‘अ कर्नल डेस्टाइन्ड टू लीड’ या पुस्तकाचे क्रिकेट क्लब आॅफ इंडिया (सीसीआय) येथे आपटे आणि काँटॅÑक्टर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या वेळी दोन्ही दिग्गजांनी जुन्या आठवणी ताज्या करताना देशांतर्गत सामन्यातील एक किस्सा सांगितला. नायडू यांनी चेहºयावर चेंडू आदळल्याने दात पडल्यानंतरही झुंजार अर्धशतक झळकावल्याची रोमांचक आठवण आपटे यांनी सांगितली.
१९५२मध्ये झालेल्या तत्कालीन बॉम्बे संघाकडून रणजी अंतिम सामन्यात खेळलेल्या आपटेंनी आठवण सांगितली, ‘‘त्या सामन्यात अष्टपैलू दत्तू फडकरने नायडूंना भेदक बाऊंसर टाकला. हा चेंडू नायडू यांनी सरळ पुढे येऊन खेळला आणि अंदाज चुकल्याने चेंडू त्यांच्या चेहºयावर आदळला. या वेळी त्यांचा दात तुटला. मी लगेच धावत त्यांच्याजवळ गेलो; पण त्यांनी आम्हाला माघारी परतवले आणि पुन्हा फलंदाजी करण्यास ते सज्ज झाले. त्या वेळी नायडू यांनी शानदार फलंदाजी करून ६०च्या आसपास धावांची खेळी केली; ज्यात २ षटकारांचाही समावेश होता. त्या वेळी मामासाहेब जगदाळे हे त्यांचे साथीदार होते.’’

Web Title: C. K. Naidu's memories shine; Recalled by Madhav Apte, Nari Contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.