BCCI प्रसारण हक्काची बोली ६ हजार कोटींच्या वर

भारतात पुढील पाच वर्षांत (२०१८-२०२३) होणाऱ्या द्विपक्षीय मालिकांच्या प्रसारण हक्कांची बोली एक अब्ज डॉलरजवळ पोहचली आहे. स्टार आणि सोनी या प्रसारण कंपन्यांच्या सोबतच जियोने बोली लावली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 01:47 AM2018-04-05T01:47:18+5:302018-04-05T01:47:18+5:30

whatsapp join usJoin us
BCCI's bid bid upwards of 6000 crores | BCCI प्रसारण हक्काची बोली ६ हजार कोटींच्या वर

BCCI प्रसारण हक्काची बोली ६ हजार कोटींच्या वर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली/मुंबई - भारतात पुढील पाच वर्षांत (२०१८-२०२३) होणाऱ्या द्विपक्षीय मालिकांच्या प्रसारण हक्कांची बोली एक अब्ज डॉलरजवळ पोहचली आहे. स्टार आणि सोनी या प्रसारण कंपन्यांच्या सोबतच जियोने बोली लावली आहे. आतापर्यंत ६ हजार ३२ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आहे.
वैश्विक समग्र अधिकार ज्यात भारत व बाहेरील प्रसारणासोबतच डिजीटल अधिकारही सामील आहेत. गेल्या वेळी २०१२मध्ये प्रसारण हक्क ३ हजार ८५२१ कोटी रुपयांत विकले गेले होते. दुसºया दिवशी बीसीसीआयचे प्रसारण हक्कात ५६ टक्के वाढ झाली आहे. त्यात प्रत्येक सामना जवळपास ६० कोटी रुपयांत गेला आहे. भारताला पुढच्या पाच वर्षांत तिन्ही प्रारुपात १०२ सामने खेळायचे आहेत.
बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, ‘ही भारतीय क्रिकेटची ताकद आहे. संभाव्य बोली लावणाºयांना माहित आहे की, ‘भारतात फक्त एका खेळात गुंतवणूक केल्याने फायदा आहे. आम्हाला माहित नाही की सर्वात मोठी बोली कुणी लावली मात्र तिन्ही कंपन्या अजूनही शर्यतीत आहेत.’

Web Title: BCCI's bid bid upwards of 6000 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.