बीसीसीआय सीईओ जोहरींवर अमिताभ चौधरी नाराज

महिला संघासाठी व्यवस्थापक पदाची जाहिरात देताना सचिवाची पूर्वपरवानगी घेतली नसल्याबद्दल बीसीसीआयचे काळजीवाहू सचिव अमिताभ चौधरी हे सीईओ राहुल जोहरी यांच्या कार्यशैलीवर नाराज आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 05:11 AM2017-12-05T05:11:38+5:302017-12-05T05:11:53+5:30

whatsapp join usJoin us
Amitabh Chaudhary angry at BCCI CEO Zohari | बीसीसीआय सीईओ जोहरींवर अमिताभ चौधरी नाराज

बीसीसीआय सीईओ जोहरींवर अमिताभ चौधरी नाराज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : महिला संघासाठी व्यवस्थापक पदाची जाहिरात देताना सचिवाची पूर्वपरवानगी घेतली नसल्याबद्दल बीसीसीआयचे काळजीवाहू सचिव अमिताभ चौधरी हे सीईओ राहुल जोहरी यांच्या कार्यशैलीवर नाराज आहेत. नियुक्तीच्या अधिसूचनेवर मानद सचिवाची स्वाक्षरी असावी, हा बीसीसीआयचा पायंडा आहे. जोहरी यांनी २८ नोव्हेंबर रोजी सदस्यांना पाठविलेल्या ई मेलमध्ये माहिती देत सांगितले की, सोओएने २४ आणि २५ आॅक्टोबर रोजी घेतलेल्या निर्णयानुसार भारतीय महिला क्रिकेट संघासाठी व्यवस्थापकाची नेमणूक करण्यासाठी अर्ज मागविले आहेत. याची जाहिरात बीसीसीआयच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आली. ही जाहिरात अपलोड झाल्याचे समजताच नाराज चौधरी यांनी जोहरी यांना पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात,‘एक दिवस आधी मी कार्यालयात बसलो होतो तेव्हा कुणीही याचा उल्लेख केला नाही, याचे आश्चर्य वाटते. इतक्या घाईत करण्यात आलेल्या कारवाईत पूर्वपरवानगीशिवाय माझे नाव का टाकण्यात आले, हे देखील कोडे आहे.’
भारतीय सिनियर महिला संघाचा पुढील दौरा फेब्रुवारीत आहे. जोहरी यांना यासंदर्भात विचारणा करताच त्यांनी उत्तर दिले नाही पण ही जाहिरात लवकरच काढून टाकण्यात आली. आता केवळ जीएम(परिचालन)पदाची जाहिरात अपलोड करण्यात आली आहे. तथापि यावरून दोन अधिकाºयांमध्ये मतभेद असल्याचे उघड झाले आहे.
बीसीसीआयच्या एका ज्येष्ठ अधिकाºयाने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, सध्या बोर्डाचे कार्यकारी पदाधिकारी कोण, याबाबत स्पष्टता नाही. बीसीसीआयच्या संविधानानुसार कार्यकारी सचिव हाच संस्था चालवितो. पण सीईओच्या व्यवस्थेत सीईओ हाच प्रमुख असतो. सीईओ वेतनावर असेल तर त्याने सचिवला रिपोर्ट करायला हवा. सचिव आणि सीईओची भूमिकादेखील निश्चित व्हायला हवी. सीओए प्रमुख विनोद राय यांनी आज सीईओकडून माहिती घेतली.’ 

Web Title: Amitabh Chaudhary angry at BCCI CEO Zohari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.