आरसीबीविरुद्ध चेन्नईला गोलंदाजी सुाधारण्याची चिंता

चेन्नई सुपरकिंग्सचे फलंदाज शानदार कामगिरी करीत आहेत पण शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे आव्हान परतवून लावण्यासाठी गोलंदाजी कशी सुधारायची या चिंतेने ‘धोनी अ‍ॅण्ड कंपनी’ला ग्रासले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 02:22 AM2018-05-05T02:22:56+5:302018-05-05T02:22:56+5:30

whatsapp join usJoin us
 Against the RCB, Chennai are concerned about improving bowling | आरसीबीविरुद्ध चेन्नईला गोलंदाजी सुाधारण्याची चिंता

आरसीबीविरुद्ध चेन्नईला गोलंदाजी सुाधारण्याची चिंता

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पुणे - चेन्नई सुपरकिंग्सचे फलंदाज शानदार कामगिरी करीत आहेत पण शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे आव्हान परतवून लावण्यासाठी गोलंदाजी कशी सुधारायची या चिंतेने ‘धोनी अ‍ॅण्ड कंपनी’ला ग्रासले आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीने मुंबई इंडियन्सचा १४ धावांनी पराभव केल्यानंतर धोनीच्या चेन्नई संघाकडून मागच्या सामन्यात पाच गड्यांनी झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याची खुमखुमी कायम असेल. दुसरीकडे गेल्या तीनपैकी दोन सामन्यात पराभूत झालेल्या चेन्नईपुढे विजयी पथावर परतण्याचे आव्हान आहे. आरसीबीला प्ले आॅफचे आव्हान टिकविण्यासाठी चेन्नईवर कुठल्याही स्थितीत विजय हवा आहे.
आठ सामन्यात तीन विजयासह आरसीबी पाचव्या आणि चेन्नई नऊपैकी सहा विजयासह दुसऱ्या स्थानी आहे. मुंबईकडून चेन्नई आठ गड्यांनी आणि गुरुवारी रात्री केकेआरकडून सहा गड्यांनी पराभूत झाला. या दोन्ही सामन्यात गोलंदाजीतील उणिवा चव्हाट्यावर आल्या. अंबाती रायुडू, शेन वाटसन, ड्वेन ब्राव्हो, कर्णधार धोनी आणि सुरेश रैना या सर्वांनी धावा काढल्या. रायुडूच्या ३९१ धावा केल्या. गोलंदाजीत मात्र शार्दुल ठाकूरचा अपवाद वगळता अन्य गोलंदाज अपयशी ठरल्याने आरसीबीच्या फलंदाजांना रोखायचे कसे, याचा विचार चेन्नईला करावा लागेल.

आरसीबीसाठी कोहली सातत्यपूर्ण कामगिरी करीत आहे. त्याच्या नऊ सामन्यात ४४९ धावा असून डिव्हिलियर्सच्या सहा सामन्यात २८०, क्विंटन डिकॉक २०१, आणि ब्रेंडन मॅक्यूलमने १२२ धावा केल्या. आरसीबीला चिंता असेल ती डेथ ओव्हरमध्ये टिच्चून मारा करण्याची. उमेश यादवने ११ व युजवेंद्र चहलने सात गडी बाद केले. वॉशिंग्टन सुंदर आणि मोहम्मद सिराज हे लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत.

सामन्याची वेळ : सायं. ४ वाजता
स्थळ : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे.

Web Title:  Against the RCB, Chennai are concerned about improving bowling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.