‘एसीयू’ अधिकारी रिचर्ड्सन पुण्यात पोहोचले, साळगावकर यांची चौकशी

पुणे : पिच फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळलेले क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांची चौकशी करण्यासाठी आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी विभागाचे (एसीयू) चौकशी समन्वयक स्टीव्ह रिचर्ड्सन पुण्यात पोहोचले आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:36 AM2017-10-27T00:36:23+5:302017-10-27T00:36:38+5:30

whatsapp join usJoin us
ACU Officer Richardson reached Pune, Salgaonkar's interrogation | ‘एसीयू’ अधिकारी रिचर्ड्सन पुण्यात पोहोचले, साळगावकर यांची चौकशी

‘एसीयू’ अधिकारी रिचर्ड्सन पुण्यात पोहोचले, साळगावकर यांची चौकशी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पुणे : पिच फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळलेले क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांची चौकशी करण्यासाठी आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी विभागाचे (एसीयू) चौकशी समन्वयक स्टीव्ह रिचर्ड्सन पुण्यात पोहोचले आहेत. त्यांनी याप्रकरणी साळगांवकर यांच्याकडून माहिती मिळवल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या प्रकरणी क्युरेटर साळगावकर यांना निलंबित करण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे माजी वेगवान गोलंदाज असलेले साळगावकर एका स्टिंग आॅपरेशनद्वारे दोषी आढळले आहेत. त्यांनी बुकी बनून आलेल्या दोन पत्रकारांना खेळपट्टीची माहिती देतानाच त्यांना खेळपट्टीजवळ येण्याची परवानगीही दिली. बीसीसीआयच्या एका उच्च अधिकाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर वृत्तसंस्थेला माहिती दिली की, ‘आयसीसी अधिकारी रिचर्डसन पुण्यात पोहचले असून ते आयसीसीचे एसीयू अधिकारी बीर सिंग यांच्यासह याप्रकरणी चौकशी करतील. त्यांनी साळगावकर यांच्याशी चर्चा केली आहे व स्टिंग आॅपरेशन केलेल्या त्या दोन पत्रकारांशीही चर्चा केली आहे.’
त्याचप्रमाणे, ‘रिचर्ड्सन यांनी साळगावकर यांना काही प्रश्न विचारले. साळगावकर यांना बीसीसीआय आणि राज्य संघटनेने निलंबित केले असून याप्रकरणी तपासणी सुरु आहे. अद्याप त्यांना दोषी ठरविण्यात आलेले नाही. रिचडर््सन यांनी आपला अहवाल दिल्यानंतरच आयसीसी आपला निर्णय देईल,’ अशी माहितीही बीसीसीआय अधिकाºयाने दिली.

Web Title: ACU Officer Richardson reached Pune, Salgaonkar's interrogation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.