कोहली, विजयची पुन्हा शतके; भारताचे लंकेवर पहिल्याच दिवशी वर्चस्व, ४ बाद ३७१ धावा

कर्णधार विराट कोहलीचे सलग तिसरे आणि सलामीवीर मुरली विजयच्या सलग दुसºया शतकाच्या बळावर भारताने तिस-या कसोटीच्या पहिल्याच दिवशी लंकेविरुद्ध वर्चस्व मिळवित ९० षटकांत ४ बाद ३७१ धावा उभारल्या. दोघांनी तिसºया गड्यासाठी २८३ धावांची भागीदारीही केली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 03:33 AM2017-12-03T03:33:32+5:302017-12-03T03:33:45+5:30

whatsapp join usJoin us
Kohli, Vijay turn centuries; India's dominance over Sri Lanka in the first day was 371 runs behind | कोहली, विजयची पुन्हा शतके; भारताचे लंकेवर पहिल्याच दिवशी वर्चस्व, ४ बाद ३७१ धावा

कोहली, विजयची पुन्हा शतके; भारताचे लंकेवर पहिल्याच दिवशी वर्चस्व, ४ बाद ३७१ धावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : कर्णधार विराट कोहलीचे सलग तिसरे आणि सलामीवीर मुरली विजयच्या सलग दुसºया शतकाच्या बळावर भारताने तिस-या कसोटीच्या पहिल्याच दिवशी लंकेविरुद्ध वर्चस्व मिळवित ९० षटकांत ४ बाद ३७१ धावा उभारल्या. दोघांनी तिसºया गड्यासाठी २८३ धावांची भागीदारीही केली.
कोहलीने १८६ चेंडूंत १६ चौकारांसह नाबाद १५६ धावा ठोकल्या. मुरलीने २६७ चेंडू टोलवित १३ चौकारांसह १५५ धावांचे योगदान दिले. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा रोहित शर्मा सहा धावा काढून कोहलीच्या सोबतीला होता. भारताच्या दोन फलंदाजांनी दिवसभरात प्रत्येकी दीडशे धावा ठोकण्याची ही पहिलीच वेळ आहे. काही प्रसंग वगळता लंकेच्या गोलंदाजांना दिवसभर गडी बाद करण्यासाठी परिश्रम करावे लागले.
भारताने पहिल्या सत्रात २७ षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात ११६, दुसºया सत्रात ३० षटकांत गडी न गमाविता १२९ आणि तिसºया सत्रात ३३ षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात १२६ धावा वसूल केल्या. फलंदाजीला अनुकूल वाटणाºया कोटलाच्या खेळपट्टीवर नाणेफेकीचा कौल जिंकताच कोहलीने फलंदाजी घेतली. पण शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा प्रत्येकी २३ धावा काढून बाद झाले. कोहली-विजय यांनी यानंतर ६५.४ षटके फलंदाजी करीत पाहुण्या गोलंदाजांना जेरीस आणले.
खेळपट्टीवर स्थिरावलेला धवन मात्र परेराचा शंभरावा बळी ठरला. दुसरीकडे नागपूर कसोटीत १२८ धावा ठोकणारा विजय १२ धावांवर बचावला. लकमलचा चेंडू बॅटला लागून स्लिप आणि गलीच्या मधून निघून गेला. कर्णधार कोहलीने गमागेला चौकार मारून खाते उघडले. गमागेच्या षटकात तीन चौकार मारून कोहलीने संघाच्या २०० धावा फळ्यावर लावल्या. विजयनेही स्वत:चे ११ वे आणि या मालिकेतील सलग दुसरे शतक गाठले. कोहलीने कोटलावर पहिले, सलग दुसरे आणि कारकिर्दीत २० वे शतक गाठले. अजिंक्य रहाणे एक धाव काढून बाद झाला. त्याआधी, भारताने लोकेश राहुल आणि उमेश यादव यांना बाहेर ठेवून मोहम्मद शमी आणि शिखर धवन यांना स्थान दिले. 

विराटची आणखी एका विक्रमाला गवसणी
कर्णधार विराट कोहली याने शनिवारी श्रीलंकेविरुद्ध तिसºया कसोटीत २५ धावा करताच कसोटीत पाच हजार धावांचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा तो ११ वा भारतीय फलंदाज बनला.
उपाहारानंतर मैदानात उतरल्यानंतर कोहलीने सुरंगा लकमलच्या गोलंदाजीवर खणखणीत चौकार खेचत पाच हजार धावा पूर्ण केल्या. या मालिकेत पहिल्या सामन्यात तो पहिल्या डावात शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर दुसºया डावात त्याने नाबाद १०४ धावांची खेळी केली. फॉर्म कायम राखत त्याने नागपूर कसोटीत कारकिर्दीतील पाचवे द्विशतक झळकवले. या द्विशतकासह त्याने वेस्ट इंडिजच्या ब्रायन लारा यांच्याशी बरोबरी केली होती.
कोहलीने १०५ व्या डावात ही कामगिरी केली तर सुनील गावस्कर यांच्या नावे ९५ डावांत पाच हजार धावा करण्याचा विक्रम आहे. विरेंद्र सेहवागने ९९ आणि सचिन तेंडुलकरने १०३ डावांत पाच हजार धावा गाठल्या. सर डॉन ब्रॅडमन यांनी कसोटीत ५६ डावांत सर्वांत जलद पाच हजार धावांची नोंद केली आहे. या सामन्याआधी कोहलीच्या ६२ कसोटी सामन्यात ४९७५ धावा होत्या.

५ हजार कसोटी धावा करणारा ११ वा भारतीय फलंदाज भारताचा कर्णधार विराट कोहलीनं दिल्लीच्या मैदानात २५ धावा पूर्ण करताच आणखी एक विक्रम आपल्या नावे केला. त्याने कसोटी कारकिर्दीतील ५ हजार धावांचा टप्पा पार केला. असा पराक्रम करणारा विराट भारताचा अकरावा फलंदाज आहे.

६२ कसोटींत दिल्लीच्या मैदानात उतरण्यापूर्वी कोहलीने ५१.८२ च्या सरासरीनं १४ अर्धशतके आणि १९ शतकांच्या जोरावर ४९७५ धावा केल्या होत्या. तिसºया कसोटीतील पहिल्या दिवसाच्या डावात भारताचे दोन गडी बाद झाल्यानंतर विराट मैदानात आला. उपाहारापूर्वी सलामीवीर मुरली विजयच्या साथीनं कोहलीनं २२ चेंडूंचा सामना करीत ३ चौकारांच्या मदतीने नाबाद १७ धावा केल्या होत्या.

कोहली पहिला आंतरराष्टÑीय कर्णधार
तिसºया कसोटीत नाबाद शतक ठोकणारा विराट कोहली हा तीन सामन्यांच्या मालिकेत सलग तीन शतके ठोकणारा पहिला आंतरराष्टÑीय कर्णधार बनला.
आजच त्याने पाच हजार कसोटी धावांचा टप्पा गाठला. अनेक कर्णधारांनी पाच सामन्यांच्या मालिकेत तीन किंवा चार शतके ठोकली, पण तीन सामन्यांच्या मालिकेत ओळीने शतके ठोकणारा विराट पहिलाच कर्णधार ठरला.
सध्याच्या मोसमात कोहलीचे हे ११ वे शतक होते. सचिनने एका मोसमात १२ शतके ठोकली आहेत. विराटने कोलकाता येथे नाबाद १०४, नागपूर येथे २१३ आणि येथे १५६ धावा ठोकल्या.

...त्यामुळे अतिरिक्त फलंदाजासह खेळावे लागले : रत्नायके
श्रीलंकेचे गोलंदाजी प्रशिक्षक रुमेश रत्नायके यांनी भारताविरुद्ध तिसºया व अखेरच्या कसोटी सामन्यात चार गोलंदाजांसह खेळण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना फलंदाज अपयशी ठरत असल्यामुळे अतिरिक्त फलंदाजाला संधी देणे भाग पडल्याचे म्हटले आहे.
भारताने फिरोजशाह कोटला मैदानावर फलंदाजीला अनुकूल स्थितीचा लाभ घेतला. पहिल्या दिवशी ४ बाद ३७१ धावांची मजल मारत वर्चस्व गाजवले.
चार गोलंदाजांसह खेळण्याच्या निर्णयाबाबत बोलताना रत्नायके म्हणाले, ‘अतिरिक्त फलंदाजाला संधी द्यायची की अतिरिक्त गोलंदाजासह खेळायचे, हा निर्णय आम्हाला घ्यायचा होता. आमच्या फलंदाजांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
पहिल्या दिवशी फलंदाजी करण्याची वेळ आली असती तर सात फलंदाजांची गरज भासली असती. त्यामुळे आम्ही अतिरिक्त फलंदाज खेळविण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे मात्र वेगवान गोलंदाजांना जास्त गोलंदाजी करावी लागली. दुसºया लढतीदरम्यानही हे घडले होते.’
रत्नायके म्हणाले, ‘आघाडीच्या पाच फलंदाजांना छाप सोडता न आल्यामुळे अतिरिक्त फलंदाजाला संधी द्यावी लागली. अनुकूल परिस्थितीमध्ये आमची ६-५ च्या संयोजनाला पसंती राहील.’
पाठीच्या दुखापतीमुळे रंगाना हेराथने माघार घेतली आहे. याबाबत बोलताना रत्नायके म्हणाले, ‘आम्हाला हेराथची उणीव भासली. सध्याच्या संघात तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. हेराथच्या अनुपस्थितीत संदाकनला संधी मिळाली. अखेरच्या सत्रात त्याने दोन बळी घेतले. पहिल्या दोन सत्रात त्याने अशी कामगिरी केली असती तर चांगले झाले असते. त्याने गुगलीचा वापर तिसºया सत्राच्या अखेर केला. चहापानाच्या वेळी त्याला गुगलीचा वापर का करीत नसल्याचे विचारले होते. तरी त्याने तिसºया सत्राच्या अखेरपर्यंत त्याचा वापर केला नाही.’
दुखापतीनंतर पुनरागमन करणारा अँजेलो मॅथ्यूज सध्या गोलंदाजी करीत नाही, पण तो लवकरच गोलंदाजी करेल, अशी आशा रत्नायके यांनी व्यक्त केली.

भारतात प्रत्येक स्थळावर एकसारखी खेळपट्टी मिळू शकत नाही : बांगर
दक्षिण आफ्रिका दौºयासाठी तयारी करीत असतानाही नागपूर व फिरोजशाह कोटला मैदानांवर संघव्यवस्थापनाची वेगवान व उसळी घेणाºया खेळपट्ट्या तयार करण्याची मागणी पूर्ण झाली नसताना भारतीय संघाचे सहायक प्रशिक्षक संजय बांगर यांनी क्यूरेटर्सची पाठराखण केली. भारत हा विविधता लाभलेला देश असून येथे प्रत्येक मैदानावर एकसारखी खेळपट्टी तयार करणे शक्य नाही, असे बांगर यांनी म्हटले आहे.

परेराचे शंभर बळी
श्रीलंकेचा आॅफ स्पिनर दिलवान परेरा याने भारताला सलामीवीर शिखर धवन याला बाद करीत सर्वांत कमी कसोटीत शंभर गडी बाद करण्याचा विक्रम नोंदविला. परेराने २५ व्या सामन्यात ही कामगिरी केली. त्याने मुथय्या मुरलीधरनचा विक्रम मोडीत काढला. शंभर बळी घेणारा लंकेचा तो सहावा गोलंदाज बनला आहे.

समरविक्रमच्या हेल्मेटवर चेंडू आदळला
शॉर्टलेगवर क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेला लंकेचा क्षेत्ररक्षक सदिरा समरविक्रम याच्या हेल्मेटवर चेंडू आदळताच त्याला मैदान सोडावे लागले. त्याच्या डोक्याचे स्कॅन करण्यात आले आहे. तो खेळणार की नाही, याचा निर्णय आज सकाळी होईल. दिलरुवान परेराच्या चेंडूवर मुरली विजयने मारलेला फटका समरविक्रमच्या हेल्मेटवर आदळला. त्यानंतर त्याने मैदान सोडले. त्याचे ब्रेनसिटी स्कॅन करण्यात आल्याची माहिती लंकेच्या संघव्यवस्थापनाने दिली.

धावफलक
भारत पहिला डाव : मुरली विजय यष्टिचित डिकवेला गो. संदाकन १५५, शिखर धवन झे. लकमल गो. परेरा २३, चेतेश्वर पुजारा झे. समरविक्रम गो. गमागे २३, विराट कोहली खेळत आहे १५६, अजिंक्य रहाणे यष्टिचित डिकवेला गो. संदाकन १, रोहित शर्मा खेळत आहे ६, अवांतर : ७, एकूण : ९० षटकांत चार बाद ३७१. गडी बाद क्रम : १/४२, २/७८, ३/३६१, ४/३६५. गोलंदाजी : लकमल १४-२-५०-०, गमागे १७-६-६८-१, परेरा २१-०-९७-१, संदाकन २३-१-११०-२, डिसिल्व्हा ५-०-४५-०.

Web Title: Kohli, Vijay turn centuries; India's dominance over Sri Lanka in the first day was 371 runs behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.