बेंगळुरु - इंडियन प्रीमियर लीगच्या ११ व्या पर्वातील लिलावाच्या पहिल्या दिवशी सर्व संघमालकांनी युवा खेळाडूंना आपल्या संघात संधी दिली आहे. त्यातून काही युवा खेळाडूंना मोठी रक्कम या लिलावात मिळाली. मुंबईकर फलंदाज आणि १९ वर्षा आतील भारतीय संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ याला दिल्ली डेअरडेविल्स संघाने १ कोटी २० लाख रुपयांत विकत घेतले आहे.
बंगळुरूत शनिवारी झालेल्या या लिलाव प्रक्रियेत आयपीेएल संघ मालकांनी दिग्गजांपेक्षा युवा खेळाडूंना जास्त संधी दिली. युवा खेळाडूंचा नेहमीच भरणा करणाºया दिल्ली डेअरडेविल्स संघाने पृथ्वी शॉला संघात सामील करून घेतले .तर १९ वर्षाआतील दुसरा खेळाडू शुभम गिल याला १ कोटी ८० लाखात केकेआरने विकत घेतले आहे. पृथ्वी आणि गिल यांची आधारभूत किंमत २० लाख रुपये होती. त्याचप्रमाणे मुंबई इंडियन्सने कृणाल पांड्याला ८ कोटी ८० लाख रुपयांत विकत घेतले आहे. गेल्या आयपीएलच्या सत्रात आपल्या तुफानी खेळीने मने जिंकून घेणाºया संजू सॅमसन याला राजस्थान रॉयल्सने ८ कोटी रुपयांना खरेदी केले.
सूर्यकुमार यादव याच्यावर मुंबई इंडियन्सने ३ कोटी २० लाख रुपयांत विकत घेतले आहे. राशिद खान याला हैदराबादने राईट टू मॅच कार्ड वापरून ९ कोटी रुपयांत विकत घेतले.
राजस्थान रॉयल्सने देखील राईट टु मॅच कार्ड वापरून अजिंक्य रहाणेला चार कोटी रुपयांत विकत घेतले. केरॉन पोलार्डला विकत घेण्यासाठी पंजाब किंग्ज इलेव्हन उत्सुक होते. मात्र मुंबई इंडियन्सने राईट टू मॅचचे कार्ड वापरले.
कर्णधार महेंद्र सिंह धोनी याचा भरवशाचा खेळाडू महाराष्ट्राचा केदार जाधव या चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यात सामील झाला आहे. फलंदाज, आॅफ स्पिनर आणि पर्यायी यष्टिरक्षक या त्याच्या क्षमतेवर सीएसकेने त्याला ७ कोटी ८० लाख रुपयात विकत घेतले आहे. १६ मार्की खेळाडूंमध्ये ग्लेन मॅक्सेवेल याला मोठी रक्कम मिळाली. त्याला ९ कोटी रुपयांत दिल्ली डेअरडेविल्सने विकत घेतले. किंग्ज इलेव्हनने मॅक्सवेलसाठी राईट टू मॅचचे कार्ड वापरले नाही.
सीएसकेने राईट टू मॅचचे कार्ड वापरत फाफ डू प्लेसिसला पुन्हा संघात घेतले. तर केन विल्यम्सनला सनरायजर्स हैदराबादने पुन्हा एकदा तीन कोटी रुपयांत विकत घेतले आहे. (वृत्तसंस्था)
बोली लागलेले युवा खेळाडू : पृथ्वी शॉ (१ कोटी २० लाख ), कमलेश नागरकोटी(३ कोटी २० लाख), राहूल तेवतिया (३ कोटी), बासिल थम्पी(९५ लाख), राहुल त्रिपाठी(३ कोटी ४० लाख), आवेश खान (७० लाख), हर्षल पटेल (२० लाख), इशांक जग्गी (२० लाख), ईशान किशन (६ कोटी २० लाख ), नवदीप सैनी, शुभमान गिल, राशिद खान, सूर्यकुमार यादव (३ कोटी २० लाख).
न विकले गेलेले खेळाडू : ख्रिस गेल, हाशिम आमला, इशांत शर्मा, मुरली विजय, पार्थिव पटेल, अॅडम झाम्पा, टीम साऊथी, मिशेल मॅक्लेघन, सॅम्युअल बद्री, मार्टिन गुप्तील, जेम्स फॉकनर,जोश हेझलवुड, मिशेल जॉनसन, जॉनी बेअरस्टो, जो रुट, सॅम बिलिंग्ज, लसिथ मलिंगा, ईश सोढी,रजनीश गुरबानी, सिद्धेश लाड.
ख्रिस व्होक्स ७ कोटी ४० लाख
करुण नायर ५ कोटी ६० लाख
कीरोन पोलार्ड ५ कोटी ४० लाख
शिखर धवन ५ कोटी २० लाख
अजिंक्य रहाणे ४ कोटी
हरभजनसिंग २ कोटी
गौतम गंभीर २ कोटी ८० लाख
युवराजसिंग २ कोटी
केन विलियम्सन ३ कोटी
फाफ डू प्लेसिस १ कोटी ६० लाख
रविचंद्रन अश्विन ७ कोटी ६० लाख
ड्वेन ब्राव्हो ६ कोटी ४० लाख