Indian bowlers best: Prasanna | भारतीय गोलंदाज सर्वोत्कृष्ट : प्रसन्ना

नवी दिल्ली - गेल्या ७० वर्षांच्या तुलनेत सध्याचा भारतीय गोलंदाजी मारा सर्वोत्कृष्ट असल्याचे मत महान फिरकी गोलंदाज ईरापल्ली प्रसन्ना यांनी व्यक्त केले.
एकूण सात गोलंदाजांपैकी पाच वेगवान गोलंदाज आहेत. यातील चार जण १४० किमी प्रतितास वेगाने मारा करतात. विराटला द. आफ्रिका दौºयात पाच गोलंदाजांसह खेळण्याची सूचना प्रसन्ना यांनी केली. वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, ‘भारताकडे जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी आहे. भूतकाळात असा धारदार मारा नव्हता.
सध्याचा वेगवान मारा बघता भारताने आफ्रिकेत पाच गोलंदाजांसह खेळावे.’ भारतीय संघ मात्र तीन वेगवान गोलंदाज आणि एका फिरकीपटूसह उतरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
भारताकडे मालिका जिंकण्याची संधी असून आश्विन पहिल्या कसोटीत खेळू शकतो, असे भाकीत त्यांनी केले.