नॉटिंगहॅम : कर्णधार विराट कोहली याने झळकावलेल्या २३व्या कसोटी शतकाक्या जोरावर भारताने तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडपुढे विजयासाठी ५२१ धावांचे भलेमोठे आव्हान दिले. भारताने आपला दुसरा डाव ७ बाद ३५२ धावांवर घोषित केला. यानंतर इंग्लंडने तिसऱ्या दिवसअखेर बिनबाद २३ धावा अशी सुरुवात केली. कोहलीने १९७ चेंडूत १० चौकारांसह १०३ धावा केल्या.
तिसºया दिवशी २ बाद १२४ धावांवरुन सुरुवात करताना भारताने आपली स्थिती मजबूत केली. कोहली - चेतेश्वर पुजारा या जम बसलेल्या जोडीने तिसºया गड्यासाठी ११३ धावांची भागीदारी करत इंग्लंडला प्रचंड दबावाखाली आणले. बेन स्टोक्सने पुजाराला बाद करुन ही जोडी फोडली. पुजाराने इंग्लंडच्या गोलंदाजांची कडवी परीक्षा घेताना २०८ चेंडूत ९ चौकारांसह ७२ धावा फटकावल्या. पुजारा बाद झाला असला, तरी एका बाजूने टिकलेल्या कोहलीने आपल्या लौकिकास साजेशी खेळी करत इंग्लंडला दमवले.
कोहली मोठी खेळी साकारणार असे दिसत असतानाच तो शतक पूर्ण केल्यानंतर लगेच बाद झाला. ख्रिस वोक्सने कोहलीला पायचीत पकडून इंग्लंडला मोठे यश मिळवून दिले. कोहलीने शानदार खेळी करत इंग्लिश गोलंदाजांना रडकुंडीला आणले.
कोहली बाद झाल्यानंतर अष्टपैलू हार्दिक पांड्याने ५२ चेंडूत ७ चौकार व एका षटकारासह नाबाद ५२ धावा फटकावल्या. अजिंक्य रहाणेने संयमी खेळी करत ९४ चेंडूत ३ चौकारांसह २९ धावा केल्या. भारताने ५२० धावांची आघाडी मिळवल्यानंतर आपला डाव घोषित केला. यानंतर इंग्लंडने सावध सुरुवात केली. तिसºया दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कूक (९*) व जेनिंग्स (१३*) खेळत होते. (वृत्तसंस्था)