I can not bat without aggression | आक्रमकतेशिवाय मी फलंदाजी करू शकत नाही
आक्रमकतेशिवाय मी फलंदाजी करू शकत नाही

केपटाऊन : तुफान फॉर्ममध्ये असलेला भारताचा कर्णधार विराट कोहली टीम इंडियाचा आधारस्तंभ असून बहुतेकवेळा त्याच्या खेळीवर संघाच्या जय-पराजयाचे गणित अवलंबून असते. आक्रमक खेळीसाठी ओळखला जाणारा कोहली आपल्या नेतृत्वामध्येही आक्रमकतेची झलक देत असतो. आपल्या सातत्यपूर्ण आणि यशस्वी कामगिरीचे गुपित आक्रमकताच असल्याचे सांगताना कोहलीने म्हटले की, ‘माझ्या खेळीतील आक्रमकता नाहीशी झाली, तर माझा खेळ कसा होईल माहीत नाही. आक्रमकतेशिवाय मी फलंदाजीच करू शकत नाही.’
तिसºया एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार दीड शतक झळकावून भारताला विजयी करण्यात निर्णायक भूमिका बजावलेल्या कोहलीने सामना संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्याने म्हटले, ‘या वर्षी मी वयाची ३० वर्षे पूर्ण करेन आणि ३४ - ३५व्या वर्षीही मी याच पद्धतीने खेळू इच्छितो. त्यामुळेच मला आक्रमक क्रिकेट खेळणे आवडते. जर माझ्या खेळातील ही आक्रमकता टिकली नाही, तर माहीत नाही मी मैदानावर कशी कामगिरी करेन.’ कोहलीने पुढे म्हटले, ‘मी ही आक्रमकता राखून ठेवू इच्छितो. यासाठी मी नियमित व्यायाम करतो आणि माझ्या आहारावरही नियंत्रण ठेवतो. जेव्हा संघाला गरज असते, तेव्हा मी माझे योगदान देतो. प्रत्येक खेळाडू अशा दिवसाच्या प्रतीक्षेत असतो.’ (वृत्तसंस्था)
>फिरकी गोलंदाजांची कामगिरी अविश्वसनीय...
दक्षिण आफ्रिका दौºयात कसोटी मालिकेमध्ये भारताच्या वेगवान गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केल्यानंतर एकदिवसीय मालिकेमध्ये फिरकी गोलंदाज दबदबा राखत आहेत. फिरकी जोडी युझवेंद्र चहल
व कुलदीप यादव यांचे तोंडभरुन कौतुक करताना कर्णधार विराट कोहलीने या दोघांची कामगिरी अविश्वसनीय असल्याचे म्हटले. कोहली म्हणाला की, ‘भारतातील पाट्या खेळपट्टीवरही चहल - कुलदीप बळी घेत असल्याने आम्हाला माहित होतं की ते येथेही बळी घेतील. ‘काहीजण विचार करतात की ते टी२० क्रिकेटमध्ये गोलंदाजी करतात, जेथे परिस्थिती कठिण असते. पण त्या ठिकाणीही चहल - कुलदीप यांनी बळी घेतले आहेत. त्यांचे संघातील स्थान मजबूत होत आहे. सध्याची त्यांची गोलंदाजी पाहून चांगले वाटत असून हे अविश्वासनीय आहे. या दोघांचे श्रेय मोठे असून त्यांचे कौतुक करण्यास माझ्याकडे शब्द नाही,’ असेही कोहलीने म्हटले.शतकी खेळाविषयी कोहली म्हणाला, ‘आंतरराष्ट्रीय सामन्यातील धावा सोप्या नसतात. खेळातील वेगानुसार स्वत:च्या खेळामध्ये बदल करावे लागतात. शेवटपर्यंत फलंदाजी करण्यात यशस्वी ठरलो याचा आनंद आहे. कारण, ९० धावांच्या आसपास मला थकल्यासारखे वाटत होते. तुम्ही स्वत:च्या शारीरिक शक्तीला क्षमतेहून अधिक खेचू शकता, जे साधारणपणे केले जात नाही. हा एक अद्भुत अनुभव होता.’
>सलग सामने जिंकल्याने आम्ही अतिआत्मविश्वासू होणार नाही
आणि यापासून खेळाडूंना दूर राखावे लागेल. या दौºयातील अखेरच्या कसोटी सामन्यासह आम्ही सलग चार सामने जिंकले आहेत. मला माझ्या संघावर गर्व आहे, पण अजून आमचे काम पूर्ण झालेले नाही.
- विराट कोहली.
>‘आमचे फलंदाज चहल - कुलदीप यांच्या गुगलीचा सामना करु शकले नाही. त्यांनी इतकी चांगली गोलंदाजी केली की, आम्ही आमचा नैसर्गिक खेळ करु शकलो नाही. त्यांनी आमच्याविरुद्ध प्रत्येक विभागात वर्चस्व राखले.यावर आम्हाला मार्ग काढावा लागेल. जर तुम्ही त्यांच्या हलक्या चेंडूलाही खेळू शकत नसाल, तर तुम्ही सहजतेने खेळत नाही. एकदा का जम बसला की तुम्ही सामन्यात आत्मविश्वासाने खेळू शकता.’
- जेपी ड्युमिनी


Web Title: I can not bat without aggression
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.