#FlashBack2017 : वर्षभरात या क्रिकेटपट्टूंनी क्रिकेटला केलं 'बाय-बाय'

2017 हे वर्ष क्रिकेटसाठी बऱ्याच आठवणी देऊन गेलं आहे.  जागतिक क्रिकटचं 2017 वर्षातील सिंहावलोकन केल्यास विविध विक्रम, वाद खेळाडूंची व संघाची कामगिरी यांसारख्या अनेक बाबी समोर येतात.

By Namdeo.kumbhar | Published: December 29, 2017 12:46 PM2017-12-29T12:46:31+5:302017-12-29T13:11:13+5:30

whatsapp join usJoin us
# FlashBack2017: Cricketers said 'Bye-Bye' to cricket | #FlashBack2017 : वर्षभरात या क्रिकेटपट्टूंनी क्रिकेटला केलं 'बाय-बाय'

#FlashBack2017 : वर्षभरात या क्रिकेटपट्टूंनी क्रिकेटला केलं 'बाय-बाय'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई -  2017 हे वर्ष क्रिकेटसाठी बऱ्याच आठवणी देऊन गेलं आहे.  जागतिक क्रिकटचं 2017 वर्षातील सिंहावलोकन केल्यास विविध विक्रम, वाद खेळाडूंची व संघाची कामगिरी यांसारख्या अनेक बाबी समोर येतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही काही खेळाडूंनी निवृत्ती घेतली. कुणी आपला फॉर्म नसल्यामुळं तर कोणी संघात निवड न झाल्यामुळं तर कोणी वय झाल्यामुळं. यामध्ये भारतीय संघातील वेगवाग गोलंदाजापासून ते पाकिस्तानच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजांचा समावेश होता. वर्षाखेरीस आपण 2017 मध्ये आंतराष्ट्रीय क्रिकेटला ज्या क्रिकेटपट्टूंनी 'बाय-बाय' म्हटलं त्यांची माहिती जाणून घेणार आहोत

विजयाचा मोहरा आशिष नेहरा 

18 वर्ष भारतीय गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर समर्थपणे बाळगणाऱ्या आशिष नेहरानं एक नोव्हेंबर रोजी आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.  नेहराने 17 कसोटी, 120  वन-डे आणि 27 टी-20 सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. मात्र अनेक वेळा दुखापतीमुळे नेहराला संघाबाहेर बसावं लागलं होतं. 19 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेहरा सात कर्णधारांबरोबर खेळला आहे. यामध्ये मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग, अनिल कुंबळे, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहलींचा समावेश आहे.

‘बूम बूम’ शाहीद आफ्रिदी 
पाकिस्तानचा अष्टपैलू शाहीद आफ्रिदीने अखेर 2017त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेतली. ‘बूम बूम’ या टोपणनावाने प्रसिद्ध असलेल्या आफ्रिदीने 1996 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या वनडेत 37 धावांत शतकी खेळी करत ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ केला. त्याचा जागतिक विक्रम तब्बल 18 वर्षे कायम होता.  2010 मध्ये कसोटी आणि 2015 वर्ल्डकपनंतर वनडेतून पायउतार होणा-या आफ्रिदीने गेल्या वर्षी भारतात झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचे कर्णधारपद भूषवले होते. अष्टपैलू आफ्रिदीने 21 वर्षाच्या कारकीर्दीत 398 वनडे सामन्यांत 8064  धावा केल्या. तसेच प्रभावी लेगस्पिनने तब्बल 395  विकेट घेतल्यात. मात्र त्याच्या वाटय़ाला केवळ 27 कसोटी सामने आले. त्यात 1176 धावा केल्यात. तसेच 48 विकेट घेतल्यात. ९८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत 1405 धावा आणि 97 विकेट आफ्रिदीच्या नावावर आहेत. 

मिसबाह उल हक 
 पाकिस्‍तान कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार मिसबाह उल हकने 2017मध्ये निवृत्ती घेतली.  विस्डेनच्या वर्षातील 5 सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटूंमध्ये मिसबाहचा समावेश झाला होता. कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाच्या निराशाजनक प्रदर्शनामुळे त्याच्या कर्णधारपदावर टीका होत होती. मिसबाह उल हक 75 कसोटीत 132 डावांत फलंदाजी करताना 5222 धावा केल्या. यामध्ये त्यानं 10 शतकं आणि 39 अर्धशतकं ठोकली. 
   
ड्वेन स्मिथ  
वेस्ट इंडिजच्या 35 वर्षीय अष्टपैलू ड्वेन स्मिथने यावर्षी आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.  स्फोटक फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या 2003/04 मध्ये आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने पदार्पण केलं होतं. चौदा वर्ष आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्मिथने वेस्ट इंडिज संघाचं प्रतिनिधित्व केलं. ड्वेनला आपल्या 10 कसोटीच्या छोट्या कार्यकाळात खास छाप सोडता आली नाही. मात्र टी-20 मध्ये त्याने आपलं स्थान निर्माण केलं होतं. स्मिथने वेस्ट इंडिजकडून शेवटचा एकदिवसीय सामना 2015 च्या विश्वचषकात खेळला होता. तर अखेरची कसोटी 2006 साली खेळली होती.  2015 नंतर त्यानं एखही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नव्हता. 

युनिस खान    
पाकिस्तानच्या ढेपाळलेल्या क्रिकेटविश्वात स्वत:चे स्थान प्रस्थापित करणाऱ्या युनूस खानने  2017 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला.नोव्हेंबर २०१५ मध्ये त्याने एकदिवसीय क्रिकेटमधून समाधानाने निवृत्ती स्वीकारली. मात्र कसोटी क्रिकेटमधील त्याचा प्रवास अविरत सुरू होता. युनिस खाननं 118 कसोटीतील 213 डावांत फलंदाजी करताना 34 शतकं आणि 33 अर्धशतकांसह 10099 धावा काढल्या आहेत. 313 ही त्याची कसोटीती सर्वोत्कृष्ट खेळी आहे. जगातील 11 देशांमध्ये शतक झळकवण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. 

नाराज रझाकचा क्रिकेटला रामराम  
ट्वेंटी 20 विश्वचषकासाठी पाकिस्तान संघात समावेश केला नाही म्हणून चिडलेल्या अष्टपैलू अब्दुल रझाकने पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा निषेध करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला.   231 एकदिवसीय व 46 कसोटी सामने खेळलाय.

Web Title: # FlashBack2017: Cricketers said 'Bye-Bye' to cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.