पराभवानंतरही न्यूझीलंड अंतिम फेरीत, इंग्लंडची २ धावांनी सरशी

कोलिन मुन्रोच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने तिरंगी टी-२० मालिकेतील अखेरच्या साखळी लढतीत इंग्लंडविरुद्ध २ धावांनी पराभूत झाल्यानंतरही अंतिम फेरीत स्थान मिळवले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 01:31 AM2018-02-19T01:31:52+5:302018-02-19T01:31:56+5:30

whatsapp join usJoin us
Even after the defeat, New Zealand won the final two matches by two runs | पराभवानंतरही न्यूझीलंड अंतिम फेरीत, इंग्लंडची २ धावांनी सरशी

पराभवानंतरही न्यूझीलंड अंतिम फेरीत, इंग्लंडची २ धावांनी सरशी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

हॅमिल्टन : कोलिन मुन्रोच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने तिरंगी टी-२० मालिकेतील अखेरच्या साखळी लढतीत इंग्लंडविरुद्ध २ धावांनी पराभूत झाल्यानंतरही अंतिम फेरीत स्थान मिळवले. आता जेतेपदासाठी न्यूझीलंडला आॅस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
सलामीवीर मुन्रोने २१ चेंडूंमध्ये ७ षटकार व ३ चौकारांच्या मदतीने ५७ धावांची खेळी केली. त्याने १८ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करताना टी-२० क्रिकेटमध्ये सर्वांत वेगवान अर्धशतक झळकावण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. मार्टिन गुप्तीलने ४७ चेंडूत ४ षटकार व ३ चौकारांसह ६२ धावा केल्या, पण न्यूझीलंडला १९५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ४ बाद १९२ धावा करता आल्या. मार्क चॅपमॅनने नाबाद ३७ धावांचे योगदान दिले.
त्याआधी, पुनरागमन करणारा कर्णधार इयोन मोर्गनच्या नाबाद ८० धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने ७ बाद १९४ धावांची मजल मारली. न्यूझीलंडने आक्रमक सुरुवात करताना आवश्यक रन रेटनुसार धावा फटकावल्या होत्या. त्यात मुन्रोने महत्त्वाची भूमिका बजावली. मुन्रो - गुप्तील यांनी पहिल्या ६ षटकांत ७८ धावांची आक्रमक भागीदारी केली. आदिल राशिदने मुन्रोला बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. यानंतर गुप्तील व चॅपमॅन यांची झुंज अखेर अपयशी ठरली. (वृत्तसंस्था)

दुखापतीमुळे गेल्या दोन सामन्यांत खेळू न शकलेल्या मॉर्गनने ४६ चेंडूंना सामोरे जाताना ६ षटकार व ४ चौकार लगावले. चौथ्या षटकात इंग्लंडची २ बाद २४ अशी अवस्था असताना मोर्गन खेळपट्टीवर आला. त्याने डेव्हिड मलानसोबत (५३) तिसºया विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली. मलानने पाचव्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात चौथे अर्धशतक झळकावले.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतला. इंग्लंड संघाने अखेरच्या १० षटकांत १०९ धावा वसूल केल्या. न्यूझीलंडतर्फे ट्रेंट बोल्टने ५० धावांत ३ तर टीम साऊदीने २२ धावांत २ बळी घेतले.

Web Title: Even after the defeat, New Zealand won the final two matches by two runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.