चेन्नई सुपरकिंग्स सर्वात संतुलित संघ

सुरेश रैनाच्या रुपाने त्यांच्याकडे आघाडीच्या फळीमध्ये एक डावखुरा फलंदाज असून तो आक्रमक फलंदाजी करतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:01 AM2018-04-22T00:01:42+5:302018-04-22T00:01:42+5:30

whatsapp join usJoin us
Chennai SuperKing's most balanced team | चेन्नई सुपरकिंग्स सर्वात संतुलित संघ

चेन्नई सुपरकिंग्स सर्वात संतुलित संघ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रा जस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्सचा जो संघ खेळला तो पूर्णपणे एक संतुलित संघ असल्याचे म्हणता येईल. संघ तयार करण्याची ही एक उत्तम व चांगली पद्धत आहे. तसे बघता आयपीएलचे अनेक संघ संतुलित आहेत. आघाडीच्या सहा खेळाडूंमध्ये गोलंदाज व यष्टिरक्षकाचा समावेश आहे. पण, चेन्नई सुपरकिंग्सचा विचार केला तर संघ अधिक शानदार भासतो. त्याच्या आघाडीच्या सात खेळाडूंमध्ये वॉटसन व ब्राव्होचा समावेश आहे. दोन्ही खेळाडू आपल्या पद्धतीने गोलंदाजी करतात आणि डावामध्ये वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या पद्धतीने फलंदाजीमध्ये आपली छाप सोडतात. वॉटसन डाव सावरतो तर ब्राव्हो अखेर फिनिशिंग टच देतो.
सुरेश रैनाच्या रुपाने त्यांच्याकडे आघाडीच्या फळीमध्ये एक डावखुरा फलंदाज असून तो आक्रमक फलंदाजी करतो. त्याचसोबत धोनी व बिलिंग्स हेसुद्धा आहेत. त्यातच जडेजाची उपस्थिती महत्त्वाची ठरते. फिरकीला अनुकूल खेळपट्टी असेल तर त्याच्याकडून चार षटके गोलंदाजी करता येईल.
राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्यांनी करण शर्माला संधी दिली. तो पॉवर प्लेमध्ये मोठे फटके लगावू शकतो, पण ही भूमिका हरभजन सिंगही बजावू शकतो. याचा अर्थ ९, १० व ११ व्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची गरज नाही. गोलंदाजीमध्ये दीपक चाहर व शार्दुल ठाकूर पॉवर प्ले व डेथ ओव्हर्समध्ये आपली भूमिका चोखपणे बजावतात.
फलंदाजीमध्ये आघाडीच्या फळीत त्यांच्याकडे फाफ ड्युप्लेसिस व वॉटसन यांना खेळविण्याचा पर्याय आहे. त्यानंतर रायडू आहे. जर त्यांना अतिरिक्त पेसरची गरज असेल तर ते दोन भारतीय फिरकीपटूंना संधी देत मार्क वूडला खेळवू शकतात. त्यांच्या सुदैवाने वॉटसन, ब्राव्हो व रैना हे सर्व प्रमुख खेळाडू चांगल्या फॉर्मात आहेत. ते उर्वरित खेळाडूंचे दडपण आपल्या खांद्यावर घेऊन चालत आहेत आणि धोनीला कर्णधार म्हणून गरज असलेले सर्व पर्याय वापरण्याची संधी देत आहेत. आयपीएलच्या सर्वांत खडतर स्थितीत खेळताना त्यांच्यापुढे आव्हान राहील. त्यांना १० दिवसांमध्ये ५ सामने खेळायचे आहेत. जर ते या परीक्षेत यशस्वी ठरले, तर हा भाग त्यांच्यासाठी एका परिकथेप्रमाणे ठरेल.
(टीसीएम)

Web Title: Chennai SuperKing's most balanced team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.