राजकारणात तडजोडी कशा करायच्या, माझ्याकडून शिका ! रामदास आठवलेंचा नाराजांना सल्ला

By विजय सरवदे | Published: April 22, 2024 12:36 PM2024-04-22T12:36:26+5:302024-04-22T12:40:30+5:30

यावेळीही मला तिकीट मिळाले नाही. पण मी कुणाला पाडण्याचा प्रयत्न करणार नाही, असे रामदास आठवले यांनी मिश्कीलपण सांगितले.

How to compromise in politics, learn from me! Ramdas Athawale's advice to the disaffected | राजकारणात तडजोडी कशा करायच्या, माझ्याकडून शिका ! रामदास आठवलेंचा नाराजांना सल्ला

राजकारणात तडजोडी कशा करायच्या, माझ्याकडून शिका ! रामदास आठवलेंचा नाराजांना सल्ला

छत्रपती संभाजीनगर : राजकारण आणि समाजकारणात अनेकदा तडजोडी कराव्या लागतात. त्या कशा करायच्या ते लोकांनी माझ्याकडून शिकाव, असा अनाहूत सल्ला केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी नाराजांना दिला.

आठवले हे एका खाजगी समारंभासाठी रविवारी शहरात आले होते. त्यावेळी पत्रकारांसोबत संवाद साधताना ते म्हणाले, यावेळी शिर्डी मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा मी प्रयत्न केला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे ती जागा रिपाइंला सुटली नाही. मागच्यावेळी शिर्डी मतदारसंघातून मला हरवण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि विखे पाटलांचा हात होता. त्यांनी गावागावांत प्रचार केला की, मी निवडून आलो, तर ॲट्रोसिटीच्या केसेस वाढतील. यावेळीही मला तिकीट मिळाले नाही. पण मी कुणाला पाडण्याचा प्रयत्न करणार नाही, असे त्यांनी मिश्कीलपण सांगितले.

मला कॅबिनेट मंत्रिपदाचे आश्वासन
मला आता केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले आहे. पण, सरकारसमोर असलेल्या काही तांत्रिक अडचणींचाही विचार करावा लागतो. एनडीए सरकारमध्ये १-१, २-२ खासदार असलेले अनेक पक्ष आहेत. त्यांना कोणालाच कॅबिनेट मंत्रिपद मिळालेले नाही. परंतु, आपला चेहरा हा देशपातळीवरचा आहे. बाकीचे पक्ष त्या त्या राज्यापुरते मर्यादित आहेत. त्यामुळे मला कॅबिनेट मंत्रिपद दिले तर एनडीए सरकारचाच फायदा आहे, असे आठवले म्हणाले.

Web Title: How to compromise in politics, learn from me! Ramdas Athawale's advice to the disaffected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.