Lok Sabha Election 2019 Dhanora is a Village in Nandura Taluka in Buldhana | Lok Sabha Election 2019 : लक्षवेधक ठरले धानोरा येथील आदर्श मतदान केंद्र
Lok Sabha Election 2019 : लक्षवेधक ठरले धानोरा येथील आदर्श मतदान केंद्र

ठळक मुद्देधानोरा येथे निवडणूक विभागाने आदर्श मतदान केंद्राची स्थापना केली होती. मतदान केंद्राबाहेर मंडप टाकून तसेच स्वागत गेट उभारून मतदान केंद्र सजविण्यात आले होते. मतदान कक्षा समोरील परिसर परिसराची रांगोळीने सजावट करण्यात आली होती.

नांदुरा -  धानोरा येथे निवडणूक विभागाने आदर्श मतदान केंद्राची स्थापना केली होती. यामध्ये मतदान केंद्राबाहेर मंडप बसायला सोफा सेट, मुलांना खेळण्याकरता खेळणी आदींची व्यवस्था केल्याने सदर मतदान केंद्र लक्षवेधक ठरले आहे. 

नांदुरा तालुक्यातील निर्मलग्राम तसेच अनेक पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत धानोरा येथे आदर्श निवडणूक कक्ष तयार करण्याचा निर्णय निवडणूक विभागाने घेतला होता. त्यानुसार जिल्हा परिषद शाळा धानोरा येथील मतदान केंद्राच्या परिसराची सजावट निवडणूक विभागाने केली होती. यामध्ये मतदान केंद्राबाहेर मंडप टाकून तसेच स्वागत गेट उभारून मतदान केंद्र सजविण्यात आले होते. मंडपाच्या आत वयोवृद्ध व इतर मतदारांना बसण्याकरिता सोफा सेट  व खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती.

मतदान केंद्रात जाण्या-येण्याच्या मार्गामध्ये मॅटिंग टाकून तसेस फुग्यांच्या कमानी उभारून सर्वकाही लक्षवेधक करण्यात आले होते. मतदारांसोबत आलेल्या लहान मुलांना खेळण्याकरता काही खेळणीही ठेवण्यात आली होती. मतदान कक्षा समोरील परिसर परिसराची रांगोळीने सजावट करण्यात आली होती. एखादा लग्न प्रसंगाला शोभावा असा थाट करण्यात आल्याने ग्रामीण भागातील नागरिकांकरिता सदर मतदान केंद्र लक्षवेधक ठरले. मतदान केंद्र परिसरात येताच काढलेल्या रांगोळ्या स्वागत गेट व आत बसण्याची व्यवस्था आणि तसेच मुलांना खेळण्यासाठी खेळणे याची चर्चा परिसरात होती. या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे निवडणूक विभागाचे धानोरा येथील हे मतदान केंद्र लक्षवेधक ठरले.

मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात देशाच्या १३ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील ११७ मतदारसंघांत मतदान होणार असून, त्यात महाराष्ट्रातील १४ मतदारसंघांचाही समावेश आहे. यात मंत्री गिरीश बापट, सुजय विखे-पाटील, तसेच राष्ट्रवादीचे सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, सुनील तटकरे, स्वाभिमानीचे राजू शेट्टी आदी दिग्गज रिंगणात आहेत. या टप्प्यात १९ महिला उमेदवार रिंगणात असून, सर्वाधिक ४ महिला बारामतीतून भाग्य आजमावत आहेत. पुणे व बारामतीमध्ये प्रत्येकी ३१ उमेदवार आहेत. या टप्प्यासाठी महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अनेक सभा घेतल्या. 


 


Web Title: Lok Sabha Election 2019 Dhanora is a Village in Nandura Taluka in Buldhana
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.