मतदान यंत्रात बिघाड, भालेगाव बाजार येथे मतदान थांबले!

By अनिल गवई | Published: April 26, 2024 09:24 AM2024-04-26T09:24:37+5:302024-04-26T09:25:23+5:30

Lok Sabha Election 2024 : खामगाव शहर आणि परिसरात मतदान शांततेत सुरू

Failure in the voting machine, voting stopped at Bhalegaon Bazar, Lok Sabha Election 2024 : | मतदान यंत्रात बिघाड, भालेगाव बाजार येथे मतदान थांबले!

मतदान यंत्रात बिघाड, भालेगाव बाजार येथे मतदान थांबले!

खामगाव: लोकसभा निवडणुकीसाठी खामगाव विधानसभा मतदार संघातील विविध मतदान केंद्रात शुक्रवारी सकाळी  ७ वाजता मतदान शांततेत सुरू झाले. दरम्यान सकाळी ७:३० वाजता खामगाव तालुक्यातील भालेगाव बाजार येथील मतदान केंद्रातील एका मतदान यंत्रात बिघाड निर्माण झाला. त्यामुळे येथील मतदान प्रक्रीयेत काही काळ व्यत्यय निर्माण झाला होता.

प्राप्तमाहितीनुसार, भालेगाव बाजार येथील मराठी पूर्व जिल्हा परिषद शाळा मतदान केंद्र क्रमांक १९१ या केंद्रातील एका मतदान यंत्रात अचानक बिघाड निर्माण झाला. मतदान यंत्र चुकीची वेळ आणि तारीख दाखवित होते. त्यामुळे मतदात्यांसह उमेदवारांच्या प्रतिनिधींनी यावर आक्षेप घेतला. काहींनी मतदान चुकीच्या ठिकाणी जात असल्याचाही आरोप केला. सकाळी साडेसात वाजता हा प्रकार घडला. 

खामगाव येथून दुसरे मतदान यंत्र बोलाविण्यात आले. सकाळी ८.४५ वाजता दरम्यान येथील मतदान प्रक्रीया सुरळीत झाली. मतदान यंत्रातील बिघाडामुळे जवळपास सव्वातासाचा वेळ गेल्याची ओरड करीत येथे मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात आली. सकाळी ९ वाजेपर्यंत खामगाव शहरातील सर्वच आणि तालुक्यातील मतदान केंद्रावर मतदान शांततेत सुरू होते.

Web Title: Failure in the voting machine, voting stopped at Bhalegaon Bazar, Lok Sabha Election 2024 :

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.