Tiger Shroff and Direction Patni's 'Disclaimer' Kirti Sanan and Sushant Singh Rajput on the path of !! | ​टायगर श्रॉफ अन् दिशा पाटनीचा ‘नकार’ क्रिती सॅनन अन् सुशांत सिंग राजपूतच्या पथ्यावर!!

टायगर श्रॉफ व दिशा पाटनी यांच्या ‘बागी2’ची चर्चा अद्यापही थांबलेली नाही. शंभर कोटी क्लबमध्ये कधीच सामील झालेल्या या चित्रपटाची बॉक्सआॅफिसवरची घोडदौड अद्यापही थांबलेली नाही. या चित्रपटाने टायगर व दिशाची आणखी एक हॉट जोडी बॉलिवूडला दिली. ‘बागी2’ सुपरडुपर हिट झाल्यानंतर तर या रिअल लाईफ लव्ह कपलची डिमांड आणखीचं वाढली आहे.  इतकी की, हॉलिवूडच्या एका प्रॉडक्शन कंपनीनेही या जोडीला आपल्या पुढील प्रोजेक्टची आॅफर दिली. अर्थात आपल्या बिझी शेड्यूलमुळे दिशा व टायगरला ही आॅफर नाकारावी लागली. टायगर सध्या ‘स्टुडंट आॅफ द ईयर2’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. यानंतर तो हृतिक रोशनसोबत एका चित्रपटात बिझी होणार आहे. दिशाचे म्हणाल तर सध्या ती ‘संघमित्रा’चे शूटींग करतेय. अशास्थितीत साहजिकचं दिशा व टायगर दोघांनाही हॉलिवूडचा हा प्रोजेक्ट साईन करणे शक्य नव्हते. मग काय, हा इतका मोठा चित्रपट दिशा व टायगरच्या हातून गेला आणि सुशांत सिंग राजपूत व क्रिती सॅननच्या झोळीत पडला. होय, ऐकता ते खरे आहे. टायगर व दिशाने नकार दिल्यानंतर संबंधित मेकर्सनी आपल्या चित्रपटासाठी दुस-या रिअल लाईफ कपलचा शोध सुरू केला आणि हा शोध क्रिती व सुशांतपर्यंत येऊन थांबला.

ALSO READ : टायगर श्रॉफने वरुण धवनला टाकले मागे, जाणून घ्या ‘बागी-२’ची कमाई!

आता हा  प्रोजेक्ट कुठला, हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सूक असाल तर हा ‘डर्टी डान्सिंग’ या हॉलिवूडपटाचा हिंदी रिमेक आहे. या डान्सआधारित चित्रपटासाठी प्रोड्यूसरला एका कोरिओग्राफरचा शोध आहे. जो हा चित्रपट दिग्दर्शित करू शकेल. चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. बॉलिवूडचे प्रेक्षक ध्यानात घेऊन या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली जात आहे. कास्ट आणि क्रू फायनल होताच सुशांत व क्रिती यासाठी तयारी सुरू करणार आहेत. या चित्रपटात क्रिती व सुशांत जबदस्त डान्स करताना दिसणार आहे. क्रिती व सुशांत या रिअल लाईफ कपला हा एकत्र असा दुसरा चित्रपट असेल. यापूर्वी ही जोडी ‘राबता’मध्ये दिसली होती. अर्थात हा चित्रपट दणकून आपटला होता.
Web Title: Tiger Shroff and Direction Patni's 'Disclaimer' Kirti Sanan and Sushant Singh Rajput on the path of !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.