काजोलचे 'हेलिकॉप्टर ईला'मधील हे गाणे झाले प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 05:44 PM2018-09-25T17:44:10+5:302018-09-25T17:45:00+5:30

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण व अभिनेत्री तब्बू यांचा 1994 साली 'विजयपथ' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील 'रुक-रुक रुक अरे बाबा रुक' हे गाणे लोकप्रिय झाले होते. हे गाणे आता नव्याने दाखल झाले आहे

This song from Kajol's 'Helicopter Ella' has been published | काजोलचे 'हेलिकॉप्टर ईला'मधील हे गाणे झाले प्रदर्शित

काजोलचे 'हेलिकॉप्टर ईला'मधील हे गाणे झाले प्रदर्शित

ठळक मुद्दे'रुक-रुक रुक अरे बाबा रुक'वर थिरकतेय काजोल


बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण व अभिनेत्री तब्बू यांचा 1994 साली 'विजयपथ' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील 'रुक-रुक रुक अरे बाबा रुक' हे गाणे लोकप्रिय झाले होते. हे गाणे आता नव्याने दाखल झाले आहे. हे गाणे काजोलचा आगामी चित्रपट 'हेलिकॉप्टर ईला'मध्ये पाहायला मिळणार आहे. हे गाणे नुकतेच काजोल व या चित्रपटाचा निर्माता अजय देवगणने ट्विटरवर प्रदर्शित केले आहे. 
बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी काजोल व अजय देवगण ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. या दोघांच्या चित्रपटातील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली. यावेळी ते दोघे निर्माता आणि अभिनेत्रीच्या रुपात एकत्र काम करत आहेत. काजोलचा आगामी चित्रपट 'हेलिकॉप्टर ईला' 12 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची निर्मिती अजय देवगणने केली आहे. या चित्रपटात काजोल सिंगल मदरच्या भूमिकेत दिसणार आहे. जी आपल्या मुलाबाबत खूप सेन्सिटिव्ह असते. या चित्रपटातील 
रिलीज झालेली गाणी चांगलीच चर्चेत आहेत. यात अजय देवगण व तब्बू यांचा 1994 साली प्रदर्शित झालेला चित्रपट विजयपथमधील रुक रुक रुक अरे बाबा रुक हे गाणे नव्याने पाहायला मिळते आहे. या गाण्यावर काजोलने दमदार नृत्य केले आहे. 


या गाण्याला संगीत राघव सच्चर यांनी दिले आहे व पालोमी घोषने स्वरसाज दिला आहे. हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

'हेलिकॉप्टर ईला' चित्रपटात काजोलने ईलाची भूमिका साकारली आहे. तिला गाणे गाण्याची आवड असते. मात्र मुलाच्या जबाबदाऱ्यांमुळे ती आपल्या आवडीकडे दुर्लक्ष करते. तिला आपल्या मुलाचे संगोपन खूप चांगले करायचे असते. त्यामुळे नेहमी त्याच्यासोबत राहून ती त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत असते, असे या सिनेमात दाखवण्यात आले आहे.

Web Title: This song from Kajol's 'Helicopter Ella' has been published

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.