ही अभिनेत्री दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये करणार कमबॅक, गेल्या काही वर्षांपासून झळकतेय छोट्या पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 06:00 AM2019-07-17T06:00:00+5:302019-07-17T06:00:02+5:30

ही अभिनेत्री चित्रपटांमध्ये काम करत नसली तरी ती छोट्या पडद्यावर झळकत आहे.

Shilpa Shetty to finally make her Bollywood comeback | ही अभिनेत्री दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये करणार कमबॅक, गेल्या काही वर्षांपासून झळकतेय छोट्या पडद्यावर

ही अभिनेत्री दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये करणार कमबॅक, गेल्या काही वर्षांपासून झळकतेय छोट्या पडद्यावर

ठळक मुद्देरमेश तौराणी त्यांच्या प्रोडक्शनच्या आगामी चित्रपटावर सध्या काम करत असून या चित्रपटात यामी गौतम, दिलजित दोसांज मुख्य भूमिकेत आहेत. आता या चित्रपटात शिल्पा शेट्टीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत असणार असल्याचे म्हटले जात आहे.

शिल्पा शेट्टीने बाजीगर या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने त्यानंतर एकाहून एक हिट चित्रपट दिले. तिने धडकन, रिश्ते, गर्व, मैं खिलाडी तू अनाडी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिने मोठ्या पडद्यानंतर छोट्या पडद्यावर देखील तिचे प्रस्थ निर्माण केले आहे. सुपर डान्सरमधील सुपर से उपर बोलण्याची तिची अदा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या कार्यक्रमाचा तिसरा सिझन नुकताच संपला आहे. 

शिल्पा गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. दरम्यानच्या काळात दोस्ताना यांसारख्या अनेक चित्रपटात ती आयटम साँगवर थिरकली होती. पण २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या लाईफ इन मेट्रो आणि अपने चित्रपटानंतर ती कोणत्याच चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली नव्हती. पण आता शिल्पाच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. शिल्पा आता चित्रपटामध्ये झळकणार असून स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार ती रमेश तौराणी प्रोडक्शनच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे.

रमेश तौराणी त्यांच्या प्रोडक्शनच्या आगामी चित्रपटावर सध्या काम करत असून या चित्रपटात यामी गौतम, दिलजित दोसांज मुख्य भूमिकेत आहेत. आता या चित्रपटात शिल्पा शेट्टीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत असणार असल्याचे म्हटले जात आहे. रमेश तौराणी यांनी मुंबई मिररशी बोलताना सांगितले होते की, माझ्या आगामी चित्रपटासाठी दिलजित आणि यामी यांनी होकार दिला आहे. त्यामुळे एक फ्रेश जोडी प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट एक कॉमेडी चित्रपट असून एका जोडप्याची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

शिल्पाला काही महिन्यांपूर्वी तिच्या कमबॅकबद्दल एका मुलाखतीत विचारण्यात आले होते. त्यावर तिने सांगितले होते की, मी कुठेच गेलेली नाहीये. मी छोट्या पडद्यावर काम करत आहे. तसेच जाहिरातीमध्ये देखील झळकत आहे. माझ्याकडे अनेक पटकथा येत असून त्यातील काही मला आवडत नाहीत तर काही आवडतात... माझे कुटुंब, मुलगा घर यांना सोडून अनेक तास चित्रीकरणाला द्यायचे म्हणजे त्यासाठी चित्रपटाची कथा देखील तितकीच चांगली असली पाहिजे. चांगली भूमिका असेल तर मी नक्कीच चित्रपटात काम करेन. 

Web Title: Shilpa Shetty to finally make her Bollywood comeback

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.