शाहरूखची लेक सुहाना खानने ट्रोलर्सला दिले असे उत्तर...!!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 20:44 IST2018-08-01T20:43:23+5:302018-08-01T20:44:04+5:30
किंगखान शाहरूखची मुलगी यापलीकडे वोगच्या कव्हरपेजवर झळकण्याइतपत सुहानाकडे कुठलीही पात्रता नाही, अशा काय काय प्रतिक्रिया उमटल्यात. अनेक मुद्यांवर तिची खिल्लीही उडवण्यात आली. यावर सुहाना काय बोलते, याकडे सर्वांचे लक्ष होते.

शाहरूखची लेक सुहाना खानने ट्रोलर्सला दिले असे उत्तर...!!
किंगखान शाहरूख खान आणि गौरी खान यांची लाडकी लेक सुहाना खान ही आज ‘वोग इंडिया’ या जगप्रसिद्ध मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकली. सुहाना व तिच्या कुटुंबासाठी हा आनंदाचा क्षण होता, याच वादचं नाही. कारण जगप्रसिद्ध फॅशन मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकणे म्हणजे, सुहानासाठी ग्लॅमर वर्ल्डचे दरवाजे खुले होणे. पण सुहाना कव्हर गर्ल बनली आणि सोशल मीडियावर नेपोटिजम अर्थात बॉलिवूडमधील घराणेशाहीवर पुन्हा चर्चा सुरु झाली. किंगखान शाहरूखची मुलगी यापलीकडे वोगच्या कव्हरपेजवर झळकण्याइतपत सुहानाकडे कुठलीही पात्रता नाही, अशा काय काय प्रतिक्रिया उमटल्यात. अनेक मुद्यांवर तिची खिल्लीही उडवण्यात आली. यावर सुहाना काय बोलते, याकडे सर्वांचे लक्ष होते. पण कदाचित ही टीका होणारचं याची पूरेपूर कल्पना सुहानाला असावी. असे नसते तर सोशल मीडियावरच्या या टीकेला तिने इतके संयमी भाषेत उत्तर दिले नसते. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत ती यावर बोलली. ‘घरी माझ्यासाठी सगळ्या गोष्टी सामान्य आहे. पण खरे आव्हान घराबाहेरच्या जगात आहे. लोक मला कसे जज करतात, विशेषत: सोशल मीडियावर लोक काय बोलतात, हे अनेकदा त्रासदायक असतं. माझ्या प्रायव्हेट इन्स्टाग्रामवरचे काही फोटो लीक झालेत आणि लोकांनी माझ्याबद्दल बोलणे सुरू केले. जे लोक माझ्याबद्दल बोलत आहेत, ते मला ओळखतही नाही. ते फक्त बोलायचे म्हणून बोलतात आणि समोरच्याचा आत्मविश्वास कमी करतात. मी अशा ट्रोलर्सबद्दल फार विचार करत नाही. कारण द्वेष करणारे द्वेषचं करणार. लोकांच्या कमेंट्स ऐकून मला त्रास होतो. पण जगात असंख्य लोक यापेक्षाही त्रासातून जातात, असा विचार करून मी समोर जाते. काहीही झाले तरी आत्मविश्वास डगमगू द्यायचा नाही, हे मी पक्के ठरवले आहे,’ असे सुहाना म्हणाली.
सुहाना सध्या लंडनमध्ये शिकतेय. पुढील वर्षी ती ग्रॅज्युएट होईल.