शाहरूख खान आणि काजोल या दोघांची आॅनस्क्रीन जोडी ही प्रत्येक पिढीची आवडती जोडी आहे. शाहरूख व काजोलला स्क्रिन शेअर करताना पाहणे चाहत्यांसाठी कुठल्याही ट्रिटपेक्षा कमी नसते. गत शुक्रवारी शाहरूख व काजोल या दोघांनी कोलकाता फिल्म फेस्टिवलला हजेरी लावली. या दोघांना एकत्र पाहून जणू चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

जणू   एकमेकांना अनेक वर्षांनंतर भेटत असल्यासारखे हे दोघेही परस्परांना भेटले. दोघांनीही धम्माल मस्ती केली, परस्परांसोबत धम्माल एन्जॉय केले.  ब्लॅक सूटमधील शाहरूख आणि हिरव्या रंगाच्या साडीतील काजोलची ही धम्माल मस्ती पाहून उपस्थितांना ‘कुछ कुछ होता है’ आणि ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटांची आठवण झाली नसेल तर नवल.   काजोल व शाहरूखचे हे फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही या दोन्ही चित्रपटांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. या फोटोंमध्ये  दोघांचाही अंदाज अगदी तसाच आहे. म्हणजेच, खट्याळ शाहरूख आणि साधी भोळी खळखळून हसणारी काजोल.

शाहरूख व काजोलच्या या सोहळ्यातील कॅन्डिड फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. शाहरूख व काजोल एकमेकांत इतके गुंग झाले आहेत की, आपण स्टेजवर आहोत, जणू याचेही भान त्यांना उरले नाही.

अनेक प्रयत्न करूनही दोघांनाही गंभीर होणे जमत नाहीयं, असे हे फोटो पाहिल्यानंतर वाटतेय. शाहरूख व काजोल २४ वर्षांपूर्वी ‘बाजीगर’ या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र दिसले होते. तेव्हापासून निर्माण झालेली त्यांच्यातील मैत्री आजही कायम आहे. मी काजोलबद्दल कमालीचा केअरिंग आहे, असे शाहरूख म्हणतो. या फोटोंवरून तुम्हाला ते दिसेलच.ALSO READ: रोहित शेट्टी बहकला अन् म्हणून फ्लॉप झाला शाहरूख खान - काजोलचा ‘दिलवाले’ ! वाचा, एक इंटरेस्टिंग Hidden Story

कोलकाता फिल्म फेस्टिवलमध्ये शाहरूख व काजोलशिवाय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महानायक अमिताभ बच्चन , दिग्दर्शक महेश भट्ट, सुपरस्टार कमल हासन आदी सेलिब्रिटी हजर होत्या. या महोत्सवात ६५ देशांचे १४४ चित्रपट दाखवले जात आहेत. या सोहळ्यात शाहरूखने आपल्या भाषणाची सुरुवात बंगाली भाषेने केली. यानंतर लोकांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. पुढील वर्षी मी येथे पारंपरिक बंगाली पोशाखात येईल, असे वचनही शाहरूखने यावेळी चाहत्यांना दिले.
Web Title: SEE PICS: 'Something happens' to see Part 2? Then see this photo of Shahrukh Khan and Kajol !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.