​ पाहा : नील नितीन मुकेश अन् रूक्मिणीचा ‘वेडिंग अल्बम’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2017 09:40 AM2017-02-10T09:40:46+5:302017-02-10T15:10:46+5:30

बॉलिवूडचा चार्मिंग हिरो अशी ओळख असलेला अभिनेता नील नितीन मुकेश आणि  रूक्मिणी सहाय हे दोघेही काल (९ फेबु्रवारी) लग्नाच्या ...

See: Neil Nitin Mukesh and Rukmini's 'Wedding Album' !! | ​ पाहा : नील नितीन मुकेश अन् रूक्मिणीचा ‘वेडिंग अल्बम’!!

​ पाहा : नील नितीन मुकेश अन् रूक्मिणीचा ‘वेडिंग अल्बम’!!

googlenewsNext
लिवूडचा चार्मिंग हिरो अशी ओळख असलेला अभिनेता नील नितीन मुकेश आणि  रूक्मिणी सहाय हे दोघेही काल (९ फेबु्रवारी) लग्नाच्या बेडीत अडकले. उदयपूर येथे हा ग्रॅण्ड लग्न सोहळा झाला. या लग्नसोहळ्याचे काही छायाचित्रे आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.





 नील व रूक्मिणीच्या या लग्नसोहळ्यात सुमारे ५०० लोक सामील झालेत. तीन दिवस लग्नाचे विधी चाललेत. गत ७ फेबु्रवारीला दोघांचा रोका झाला. त्याच रात्री प्री-वेडिंग पार्टी झाली. ८ फेबु्रवारीला नील आणि रूक्मिणी यांच्या हातावर मेहंदी रंगली. मेहंदीची थीम खास राजस्थानी मेळा अशी ठेवण्यात आली होती. मेहंदीनंतर रात्र सजली ती संगीत सोहळ्याने. ‘आपकी अदाएं महिफिल सजाएं’अशी संगीत सोहळ्याची थीम होती.  



 यानंतर ९ फेबु्रवारीला संध्याकाळी नील व रूक्मिणी दोघेही लग्नबंधनात अडकले.



यावेळी रूक्मिणीने आॅर्नेट लहंगा परिधान केला होता. त्यावर खड्यांचे आणि रेशमाचे काम केले गेले होते.



तर नीलने डार्क मरून आणि गोल्ड रंगांचा रॉयल ड्रेस घातला होता. सरथ कृष्णनने हे दोन्ही ड्रेस डिझाईन केले होते.



या विवाह सोहळ्यात यश चोपडा यांची पत्नी पामेला, ऋषी कपूर, राजीव कपूर आदी सामील झालेत. विवाहसोहळ्यानंतर येत्या १७ फेबु्रवारीला नील व रूक्मिणीचे ग्रॅण्ड रिसेप्शन होणार आहे.


मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलात हे ग्रॅण्ड रिसेप्शन होणार आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना या रिसेप्शनचे निमंत्रण दिले गेले आहे.  



नीलचे हे अरेंज मॅरेज आहे. रूक्मिणी ही नीलच्या आई-वडिलांची पसंती आहे. नील हा सुप्रसिद्ध गायक मुकेश यांचा नातू आहे. नीलचे पापा नितीन मुकेश हेही गायक आहे. मात्र नीलने आजोबा वा पापाच्या मार्गावर न जाता वेगळी वाट चोखाळली. त्याने अभिनेता बनण्याचा निर्णय घेतला.  नील अखेरचा ‘वजीर’ या सिनेमात दिसला होता. याशिवाय ‘प्रेम रतन धन पायो’,‘आ देखें जरा’,‘शॉर्टकट रोमियो’,‘प्लेअर्स’,‘जॉनी गद्दार’ यासारख्या चित्रपटात तो अभिनय करून चुकला आहे.

Web Title: See: Neil Nitin Mukesh and Rukmini's 'Wedding Album' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.