‘सेक्रेड गेम्स’ने बदलले ग्रह! आता सैफ अली खान बनणार नागा साधू!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 02:14 PM2018-07-16T14:14:53+5:302018-07-16T14:20:19+5:30

सैफ अली खान सध्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमुळे सैफची बुडती नौका तरली, असेही म्हणायला हरकत नाही. कारण अर्थातचं सगळ्यांना ठाऊक आहे. 

saif ali khan to play a naga sadhu in hunter | ‘सेक्रेड गेम्स’ने बदलले ग्रह! आता सैफ अली खान बनणार नागा साधू!

‘सेक्रेड गेम्स’ने बदलले ग्रह! आता सैफ अली खान बनणार नागा साधू!

googlenewsNext

सैफ अली खान सध्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमुळे सैफची बुडती नौका तरली, असेही म्हणायला हरकत नाही. कारण अर्थातचं सगळ्यांना ठाऊक आहे. कारण दीर्घ काळापासून सैफच्या नावावर एकही हिट चित्रपट नाही. एकापाठोपाठ एक अनेक फ्लॉप दिल्यानंतर सैफच्या करिअरची करिअरची नौका डगमगू लागली होती. अशात त्याच्याकडे ‘सेक्रेड गेम्स’ ही वेबसीरिज चालून आली आणि कदाचित सैफचे ग्रह बदलले. यातील सैफचा अभिनय आत्तापर्यंतच्या त्याच्या फिल्मी करिअरमधील सर्वोत्तम अभिनयही असल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे, या प्रोजेक्टनंतर सैफकडे अनेक चांगल्या आॅफर्स चालून येत आहेत. लवकरच सैफ नागा साधूच्या भूमिकेत दिसणार आहे आणि त्याच्या या चित्रपटाचे नाव ‘हंटर’ आहे.
सैफने या भूमिकेबद्दल सांगितले की, या चित्रपटाचे शूटींग राजस्थानमध्ये झाले. यासाठी मला बरीच मेहनत घ्यावी लागली. शरीरावर बऱ्याच ठिकाणी टोचून घेतले.  केस वाढवलेत, दाढी वाढवली. या वाढलेल्या दाढी व केसांसोबत राजस्थानच्या गर्मीत शूटींग करणे अतिशय कठीण होते. शूटींगपूर्वी केसांचे सेटअप करण्यासाठी मला रोज ४० मिनिटांचा वेळ लागत असे. ५० दिवसांच्या या शूटनंतर माझ्यात अनेक बदल झालेत. माझ्या स्पॉटबॉयलाही हे बदल जाणवले. या चित्रपटाचे बहुतांश शूटींग संपले आहे. लवकरच मी माझ्या क्लिनशेव्ह लूकमध्ये दिसेल, असेही त्याने सांगितले.
तूर्तास या चित्रपटाबद्दल फार माहिती उपलब्ध नाही. पण सैफ नागा साधूच्या भूमिकेत म्हटल्यावर उत्सुकता मात्र ताणली गेली आहे.

Web Title: saif ali khan to play a naga sadhu in hunter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.