वडिलांच्या आठवणीने गहिवरली देसीगर्ल प्रियंका, फोटो शेअर करत लिहिली इमोशनल पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 12:29 PM2019-06-10T12:29:42+5:302019-06-10T12:36:36+5:30

देसीगर्ल प्रियंका चोप्रा सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. आपल्या फॅन्ससोबत प्रियंका आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

Priyanka got emotional while remembering her father | वडिलांच्या आठवणीने गहिवरली देसीगर्ल प्रियंका, फोटो शेअर करत लिहिली इमोशनल पोस्ट

वडिलांच्या आठवणीने गहिवरली देसीगर्ल प्रियंका, फोटो शेअर करत लिहिली इमोशनल पोस्ट

googlenewsNext
ठळक मुद्देप्रियंकाने वडील अशोक चोप्रा यांच्यासोबतचा लहानपणीचा थ्रोबॅक फोटो शेअर केला आहेप्रियंका लवकरच शोनाली बोसच्या 'द स्काई इज पिंक' सिनेमात दिसणार आहे

देसीगर्ल प्रियंका चोप्रा सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. आपल्या फॅन्ससोबत प्रियंका आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. प्रियंकाने नुकताच सोशल मीडियावर एक वडिलांसोबतचा फोटो शेअर करत इमोशनल पोस्ट लिहिली आहे. प्रियंकाने वडील अशोक चोप्रा यांच्यासोबतचा लहानपणीचा थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. 


या फोटोत प्रियंका एका झाड्यावर बसलेली दिसतेय. तर वडिल झाडाला पकडून उभे आहेत. प्रियंका हा फोटो शेअर करताना लिहिते, ''तुम्हाला जाऊन 6 वर्षे झाली पण असं वाटतंय तुम्ही कालच आम्हाला सोडून गेलायेत. तुमची फार आठवण येतेय.'' 


प्रियंकाचे आपल्या वडिलांशी फार जवळचे नातं होते. 2013 साली अशोक चोप्रा यांचं निधन झाले. 'डॅडीज लिटिल गर्ल' असा टॅटू प्रियंकाच्या हातावर आहे.   


प्रियंका लवकरच शोनाली बोसच्या 'द स्काई इज पिंक' सिनेमात दिसणार आहे.  या सिनेमा प्रियंकासोबत फरहान अख्तर, झायरा वसिम हे कलाकारही मुख्य भूमिका साकारत आहेत. सोनाली बोस या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. 'द स्काय इज पिंक' सिनेमा सत्य घटनेवर आधारीत आहे. या सिनेमात आयशाची भूमिका झायरा वसीमने साकारली आहे. फरहान अख्तर व प्रियंका चोप्रा आयशाच्या आई वडीलांच्या भूमिकेत दिसणार आहे. 'द स्काय इज पिंक' सिनेमा ११ ऑक्टोंबरला प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Priyanka got emotional while remembering her father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.