Pooja Bhatt's Mohit Suri? Who will direct 'Road 2'? | पूजा भट्ट की मोहित सूरी? कोण दिग्दर्शित करणार ‘सडक2’?

दीर्घकाळापासून ‘सडक2’ या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. अगदी अलीकडे आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आणि पूजा भट्ट हा चित्रपट दिग्दर्शित करणार, अशी चर्चा होती. पण आता एक ताजी बातमी आहे. होय, पूजा हा चित्रपट दिग्दर्शित करणार नसल्याचे कळतेय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा ‘सडक2’ दिग्दर्शित करणार ही बातमी खोटी आहे. पूजाऐवजी मोहित सूरी हा चित्रपट दिग्दर्शित करणार, ही बातमीही सूत्रांनी अफवा ठरवली आहे. सूत्रांचे खरे मानाल तर या चित्रपटाची स्क्रिप्ट अद्यापही पूर्ण झालेली नाही. अजूनही स्क्रिप्टवरचं काम सुरु आहे. त्यामुळे तूर्तास तरी हा चित्रपट दिग्दर्शित कोण करणार, याचा निर्णय झालेला नाही. स्क्रिप्टचे काम मार्गी लागल्यावर त्याबद्दलचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
‘सडक2’मध्ये आलिया भट्ट ही पूजा भट्टच्या मुलीच्या भूमिकेत  दिसणार असल्याचे बोलले जात आहे.  संजय दत्तला समोर ठेवून चित्रपटाची कथा लिहिली जात आहे. जो आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी आकाश-पाताळ एक करतो.  १९९१ मध्ये ‘सडक’हा चित्रपट आला होता. हा चित्रपट प्रचंड गाजला होता.  यातील चार्टबस्टर म्युझिक लोकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. या चित्रपटाने संजय दत्त रातोरात स्टार झाला होता. यात पूजा भट्ट व संजय दत्त मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात संजय दत्त एका वेश्याव्यवसायात ढकलण्यात येत असलेल्या  मुलीच्या प्रेमात पडतो आणि यानंतर दलालांपासून तिला वाचवतो, असे दाखवले गेले होते. हीच कथा पुढे नेत ‘सडक2’मध्ये संजय दत्त व त्याच्या मुलीची भूमिका दाखवली जात आहे. यात पूजा भट्ट फ्लॅशबॅकमध्ये दिसणार आहे. आता ‘सडक2’कधी येतो नि कसा रंगतो, ते बघूच. तोपर्यंत अर्थातच प्रतीक्षा. काही अपडेट असल्यास आम्ही तुम्हाला कळवूच.

ALSO READ : ​OMG! आलिया भट्टकडे नाही डॅड महेश भट्ट यांच्या चित्रपटासाठी वेळ!!
Web Title: Pooja Bhatt's Mohit Suri? Who will direct 'Road 2'?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.