The people of Kartik Aryans who have flirt with Kareena Kapoor, have fun! | ​करिना कपूरसोबत फ्लर्ट करू पाहणा-या कार्तिक आर्यनची लोकांनी अशी घेतली मजा!

अभिनेता कार्तिक आर्यन सध्या जोरात आहे. होय, कार्तिकचा ‘सोनू के टीटू की स्वीटी’ हा चित्रपट जितका जोरात आहे अगदी तितकाच. कार्तिकचा हा चित्रपट आला आणि कुणाच्याही ध्यानीमनी नसताना या चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला जमवला. आता बॉक्सआॅफिसवरचे हे यश पाहून कार्तिक सुखावला नसला तर नवल. त्यातचं कार्तिकला आणखी एक लॉटरी लागली. ती म्हणजे, जिच्यावर लहानपणापासून ‘क्रश’ होता, त्या अभिनेत्रीसोबत कार्तिकला रॅम्प वॉक करण्याची संधी मिळाली. ही अभिनेत्री कोण तर करिना कपूर. होय, अलीकडे कार्तिक व करिना दोघेही मनिष मल्होत्राच्या एका फॅशन शोसाठी रॅम्प वॉक करताना दिसले. यानंतर लगेच कार्तिकने स्वत:च्या सोशल अकाऊंटवर करिनासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओ कार्तिक करिनासाठी   ‘बनजा तू मेरी रानी...’ हे गाणे गात करिनाला इम्प्रेस करताना दिसतोय. अर्थात कार्तिकचे हे गाणे ऐकून करिना नावाची ही ‘रानी’ त्याच्यावर मेहरबान व्हावी, याआधीचं लोकांनी कार्तिकला गदागदा हलवून जागे केले.ALSO READ : ‘सोनू के टीटू की स्वीटी’ने दिला अनेकांना ‘धक्का’! बडे बडे ट्रेड पंडितही कमाई पाहून झालेत हैरान!!

होय, ‘तुम्हारी रानी किसीकी महारानी है,’ हे लोकांनी कार्तिकच्या लक्षात आणून दिले. एकंदर काय तर या व्हिडिओवरून लोकांनी कार्तिकची चांगलीच मजा घेतली. ‘वह पहले से ही पटौदी की रानी (बेगम) मल्लिका है, सैफ को पता चलेगा तो भाई मार पड़ेगी’, असे एका युजरने लिहिले. अनेक युजरला तर तैमूरही आठवला. ‘वो किसी की मम्मी है, तू रानी कैसे बना सकता है’, असा प्रश्न दुसºया एका युजरने केला.
कार्तिकने २०११ मध्ये आपली अभिनय कारकिर्द सुरु केली होती. ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूड डेब्यू केला होता. यात त्याने रजत नामक व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटात कार्तिकला सलग पाच मिनिटं न थांबता संवाद बोलायचा होता. हा संवाद हिंदी चित्रपटातील सर्वात लांब संवाद मानला जातो.
Web Title: The people of Kartik Aryans who have flirt with Kareena Kapoor, have fun!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.