ओम पुरी यांचे वादग्रस्त जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2017 01:28 PM2017-01-06T13:28:25+5:302017-01-06T13:28:25+5:30

बॉलिवूडचे ज्येष्ठ नेते ओम पुरी यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे ...

Om Puri's controversial life | ओम पुरी यांचे वादग्रस्त जीवन

ओम पुरी यांचे वादग्रस्त जीवन

googlenewsNext
बॉलिवूडचे ज्येष्ठ नेते ओम पुरी यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. ओम पुरी यांनी बॉलिवुडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. ओम पुरी हे नेहमीच अभिनयाबरोबर सामाजिक विषयांवरही ते भाष्य करत असत. ते अनेकवेळा यामुळे वादातही अडकले होते. 




1.ओम पुरी यांनी काही महिन्यांपूर्वी भारतील सैनिकांबाबत वक्तव्य करून काहीसा वाद निर्माण केला होता. त्यांचा हा वाद खूपच गाजला होता. त्यांनी दूरचित्रवाणीवरील एका कार्यक्रमात भारतीय सैनिकांचा अपमान केला होता. 'उरी हल्ल्यानंतर भारतीय चित्रपट, मालिकांत पाकिस्तानी कलावंतांवरील बंदी', असा या चर्चेचा विषय होता. ओम पुरी यांनी सैनिकांना लष्करात जा, असे कोणी सांगितले होते? शस्त्रे उचला, असे त्यांना कोणी सांगितले होते?असे प्रश्न यावेळी या कार्यक्रमात उपस्थित केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून संपूर्ण देशातून त्यांच्यावर टीका झाली होती. त्यांचा हा वाद फारच गाजला होता. त्यांच्या या वक्तव्याने ओम पुरी यांच्याविरोधात गांधीनगर पोलिस ठाण्यात आणखी एक तक्रार दाखल झाली होती. ही तक्रार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते शंकर गोरा यांनी  दाखल केली होती. ओम पुरी यांनी मानहानीकारक वक्तव्य करून जवानांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असे तक्रारीत नमूद केले आहे. आम्ही या तक्रारीची चौकशी करत आहोत, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असे चांद यांनी सांगितले. महाराष्ट्रातही ओम पुरी यांच्याविरोधात अंधेरी पोलिस ठाण्यात आॅक्टोबरला तक्रार दाखल झाली होती. अखेर या वादानंतर ओम पुरी यांनी इटावा येथील शहीद जवानाच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले होते. शहीद जवानाच्या वडिलांची माफी मागीतली होती. 



2. आयएएस, आयपीएस अधिकारी अंगठेबहाद्दर नेत्यांना सलाम ठोकतात तेव्हा मला लाज वाटते. या अंगठेबहाद्दरांची पार्श्वभूमी काय? म्हणत त्यांनी वाद ओढवून घेतला होता. त्याचबरोबर ते असेही म्हणाले की, अध्यार्हून अधिक खासदार अडाणीदेखील आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरून मात्र वाद उफाळल्यानंतर ओम पुरी यांनी माफी मागत, मी संसद आणि संविधानाचा आदर राखतो, मला भारतीय असल्याचा गर्व आहे असं म्हटले होते. 



3. आण्णा हजारे यांच्या रामलीला मैदानावर उपोषण झालेले हे सर्वानाच माहित आहे.या उपोषणावेळी ओम पुरी यांनी त्यांच्या मंचावर हजेरी लावली होती. त्यावेळी ओम पुरी यांनी राजकीय नेत्यांवर सडेतोड भाषेत टीका केली होती.



4.  आमीर खानने कथितरित्या असहिष्णुतेबाबत वक्तव्य केलं होतं. पत्नी किरणने देश सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती, असं आमीर म्हणाला होता. यावर ओम पुरी म्हणाले होते, आमीर आणि त्याची पत्नी असा विचार करु शकतात हे ऐकून मी हैराण झालो. असहिष्णुतेबाबत आमीर खानचं वक्तव्य सहन करण्यासारखं नाही. आमीरचं वक्तव्य बेजबाबदारपणाचं आहे. असं वक्तव्य करुन तुम्ही तुमच्या समुदायाला भडकवत आहात, की तयार राहा, लढा किंवा देश सोडा. 



5.  गोहत्याबाबत उफाळलेल्या वादाबाबतही ओम पुरी म्हणाले होते, ज्या देशात बीफ निर्यात करुन डॉलर कमावले जातात, तिथे गोहत्याबंदी हा पाखंडीपणा आहे  



6.  नक्षलवाद्यांबाबत ओम पुरी म्हणाले होते, नक्षलवादी हे दहशतवादी नव्हे तर फायटर आहेत. ते त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत. नक्षलवादी सामान्य माणसाला त्रास देत नाहीत.



7.  ओम पुरींनी पंतप्रधान मोदींबाबतही वक्तव्य केलं होतं. सध्या आपल्याकडे मोदींच्या कडेवर बसण्याशिवाय पर्याय नाही. कारण यापूर्वी आपण अन्य लोकांच्या कडेवर बसून अनुभव घेतला आहे. असे म्हणत त्यांनी वाद ओढवून घेतला होता. 



 
 

Web Title: Om Puri's controversial life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.