बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणीने बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे तिचा चाहता वर्गही खूप आहे. नुकतेच कियाराने मार्क्स अँड स्पेन्सर्सच्या स्टोअरच्या उद्घाटनासाठी नाशिकला गेली होती. त्यावेळी तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. ज्यात ती खूप सुंदर दिसत होती. 

कियारा नाशिकमध्ये मार्क्स अँड स्पेन्सर्सच्या स्टोअरच्या उद्घाटनावेळी तिला पाहण्यासाठी मॉलमध्ये चाहत्यांनी गर्दी केली होती. चाहत्यांची गर्दी पाहून कियारा भारावून  गेली. चाहत्यांनी तिच्यावरील प्रेम दर्शवून तिचे नाशिकमध्ये स्वागत केले.


कियाराच्या प्रोफेशनल लाईफबद्दल सांगायचे तर ती लवकरच कबीर सिंग चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत शाहिद कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

कबीर सिंग हा २०१७ साली प्रदर्शित झालेला तेलगू ब्लॉकबास्टर चित्रपट अर्जुन रेड्डीचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाची कथा अशा एका व्यक्तीची आहे जो पेशाने डॉक्टर आहे. पण, थोडा सनकी आहे आणि आदर्शदेखील. कबीर सिंग एक वेडा प्रेमी आणि एक विद्रोही देखील आहे. त्याच्या प्रेयसीच्या लग्नानंतर तो पूर्णपणे उद्धवस्त होतो आणि प्रेमात वेडापिसा होऊन दारू व ड्रग्सच्या व्यसनाच्या अधीन जातो. या हिंदी रिमेकचे दिग्दर्शन संदीप वांगा यांनी केले आहे. हा चित्रपट ३१ जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून कियारा व शाहिद पहिल्यांदाच एकत्र काम करत असून त्यांची रुपेरी पडद्यावर केमिस्ट्री पाहणे कमालीचे ठरणार आहे.

याशिवाय कियारा 'कलंक' चित्रपटात वरूण धवनसोबत फर्स्ट क्लास गाण्यावर थिरकताना दिसणार आहे.

'गुड न्यूज' या चित्रपटात अक्षय कुमार, करीना कपूर व दलजीत दोसांझसोबत कियारा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 


Web Title: Nashik Gives A Warm Welcome To Kiara Advani
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.