Katrina Kaif was surprised to hear Ranbir's news! Some of the things that Neetu singe did on seeing! | रणबीरच्या अफेअरच्या बातम्या ऐकून सैरभैर झालीय कॅटरिना कैफ! नीतू सिंगला पाहून केले असे काही!!

 रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांचे ब्रेकअप ही बातमी आता जुनी झाली. (नवी बातमी अर्थातचं तुम्हाला ठाऊक आहे़ रणबीर  कपूर व आलिया भट्टच्या रिलेशनशिपच्या बातम्या सध्या कधी नव्हे इतक्या चर्चेत आहेत.) एक काळ असा होता की, कॅटरिना रणबीरची आई नीतू सिंग हिचे मन जिंकण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होती. कपूर कुटुंबाची सून बनण्याचे स्वप्न पाहू लागली होती. पण कदाचित तिचे हे स्वप्न भंगले़ तिचे व रणबीरचे ब्रेकअप झाले. या ब्रेकअपनंतर  रणबीर व कॅटरिना या दोघांच्याही नात्यांचे संदर्भ बदलले. केवळ रणबीर व कॅटरिनाच्याच नाही तर कॅटरिना व नीतू सिंग या दोघींच्या नात्यांचेही संदर्भ बदलले. होय, असे नसते तर नीतू दिसल्यावर कॅटरिनाने तोंड लपवले नसते. एकीकडे रणबीर आलियासोबत आनंदी आहे. नीतू सिंगही आलियावर प्रचंड प्रेम उधळताना दिसताहेत. दुसरीकडे कॅटरिना नीतू सिंगला टाळण्याचे प्रयत्न करतेय.स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी कॅटरिना मुंबईच्या एका लोकप्रीय स्पोर्ट्स बारमध्ये आपल्या ‘दबंग टूर कॉन्सर्ट’ची रिहर्सल करत होती. त्याच बिल्डिंगमध्ये असलेल्या गेस्ट्रो पबमध्ये रणबीरची मॉम नीतू सिंग आपल्या मैत्रिणी रिमा जैन व लाली धवन यांच्यासोबत लंच घेत होत्या. याचदरम्यान कॅटरिना रिहर्सल संपवून बाहेर पडायला निघाली. ती लिफ्टकडे वळणार तोच तिला तिथे नीतू सिंग दिसल्या. मग काय, नीतू यांना बघताच कॅटरिना माघारी वळली. ती पुन्हा स्पोर्ट बारमध्ये शिरली. नीतू गेल्यानंतर कॅटरिना एक मिनिटही थांबली नाही आणि तिने बिल्डिंगमधून काढता पाय घेतला. नीतूने कॅटरिनाला बघितले की नाही, हे तर स्पष्ट नाही. पण कॅटरिनाने मात्र नीतू यांना बघून त्यांना टाळणेचं बेहत्तर समजले. कॅटरिनाला रणबीरच्या मॉमच्या समोर यायचे नव्हते, हेच यावरून दिसले.
तसेही रणबीर व आलियाच्या अफेअरच्या बातम्यांमुळे कॅटरिना प्रचंड नाराज असल्याचे मानले जात आहे. अर्थात अद्याप ती यावर खुलेपणाने बोललेली नाही.  पण तिची कृती बरेच काही सांगणारी आहे. ताजी घटनाही तशीच!!

ALSO READ :​see pics :रणबीर कपूरच्या फॅमिलीसोबत डिनर डेटवर पोहोचली आलिया भट्ट!!
Web Title: Katrina Kaif was surprised to hear Ranbir's news! Some of the things that Neetu singe did on seeing!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.