Jhanvi, I'm sorry ...! Arjun Kapoor's sister sent an emotional message before the release of 'Dhakk' trailer !! | ​ जान्हवी, मला माफ कर...! ‘धडक’च्या ट्रेलर रिलीजपूर्वी अर्जुन कपूरचा बहिणीसाठी भावूक संदेश!!

येत्या काही तासांत जान्हवी कपूरचा डेब्यू सिनेमा ‘धडक’चा ट्रेलर लॉन्च होणार आहे. आज जान्हवीसाठी निश्चितपणे मोठा दिवस आहे. जान्हवीची आई श्रीदेवी आज आपल्यात नाहीत. पण जान्हवीचे अख्खे कुटुंब तिच्या या आनंदात सामील आहे. होय, अगदी तिचा सावत्र भाऊ अर्जुन कपूर आणि सावत्र बहिण अंशुला कपूर हे दोघेही तिच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत, तिच्या आनंदात सामील आहेत. आज याची पुन्हा एकदा प्रचिती आहे. ‘धडक’च्या ट्रेलर लॉन्चपूर्वी अर्जुन कपूरसाठी एक भावनिक संदेश लिहिला. या संदेशाद्वारे त्याने बहिणीला शुभेच्छा तर दिल्यात. पण त्याहीपेक्षा एकापाठोपाठ एक असे तीन ट्विट करून जान्हवीबद्दलचे प्रेम, माया, आपुलकी व्यक्त केली. केवळ इतकेच नाही तर त्याने जान्हवीची माफीही मागितली. आज मी प्रत्यक्ष तुझ्यासोबत नाही, यासाठी मला माफ कर, हे सांगतांनाच भविष्यात मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, तू कुठलीही चिंता करू नकोस, हे वचन त्याने आपल्या या लाडक्या बहिणीला दिले.
‘तू आजपासून नेहमीसाठी प्रेक्षकांच्या, चाहत्यांच्या आयुष्याचा भाग बनणार आहेत. कारण तुझ्या पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होतोय. या क्षणाला सर्वप्रथम मी तुझी माफी मागू इच्छितो. कारण मी आज मुंबईत नाही. पण मी नेहमी तुझ्या सोबत असेल. तू कुठलीही काळजी करू नकोस,’असे पहिले ट्विट अर्जुनने केले.
‘मी तुला सांगू इच्छितो की, हे प्रोफेशन अद्भूत आहे. पण त्यासाठी तुला कठोर परिश्रम, चिकाटी आणि कामावरची अतोनात निष्ठा बाळगायला हवी. दुस-यांच्या विचारांचा आदर करायला शिकायला हवे. हे वाटते तितके सोपे नाही. पण मला विश्वास आहे, यासाठी तू तयार आहेस,’असे दुसरे ट्विट अर्जुनने केले.तिस-या ट्विटमध्ये त्याने जान्हवीला शुभेच्छा दिल्यात. ‘धडकच्या ट्रेलरसाठी खूप खूप शुभेच्छा़ मला विश्वास आहे की, माझे मित्र शशांक खैतान आणि करण जोहर आज तुला आणि ईशान खट्टरला रोमियो-ज्युलियट सारखे सादर करतील,’असे त्याने म्हटले.

ALSO READ : बहीण जान्हवी कपूरच्या ड्रेसवरील बातमीने पुन्हा भडकला अर्जुन कपूर!

श्रीदेवींच्या मृत्यूनंतर अर्जुन कपूर आणि त्याची बहीण अंशुला कपूर हे दोघेही जान्हवी व खुशी या सावत्र बहिणींना फुलासारखे जपतांना दिसताहेत. एकेकाळी अर्जुन व अंशुला जान्हवी व खुशीचे नावही ऐकणे पसंत करायचे नाहीत. पण श्रीदेवींच्या निधनानंतर दोघेही जान्हवी व खुशीच्या कधी नव्हे इतक्या जवळ आले आहेत. आपल्या सावत्र बहिणींना आणि वडिलांना आपली गरज आहे, याची जाणीव अर्जुनला झाली आहे आणि अशास्थितीत अर्जुन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहे. 
Web Title: Jhanvi, I'm sorry ...! Arjun Kapoor's sister sent an emotional message before the release of 'Dhakk' trailer !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.