Honeymoon Pics: Milind Soman, with wife Ankita looking at a bikini, was like this | Honeymoon Pics: मिलिंद सोमनसह बिकीनीमध्ये चील करताना दिसली पत्नी अंकिता,असा होता दोघांचा अंदाज

मिलिंद सोमनने अंकिता कंवरसह लग्नबंधनात अडकत आपल्या आयुष्याची नवी सुरूवात केली आहे.लग्नापूर्वी आणि लग्नानंतर हे कपल खूप चर्चेत होते. या दोघांच्या अजब लग्नाची गजब गोष्ट नेटीझन्सच्या डोक्यातून निघत नाही तेवढ्यात या कपलचे हनीमूनचे फोटो समोर आले आहेत.सध्या हे कपल हवाईच्या माउई आइलँडवर हनीमून साजरा करत आहेत.यामध्ये मिलिंद पत्नी अंकितासोबत बीचवर धमाल करताना दिसतोय.तसेच मिलिंद आणि अंकिताचा रोमँटिक अंदाज, त्यांच्यातील केमिस्ट्रीही पाहायला मिळत आहे.या दोघांच्या फोटोंना सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रीया मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. अलिबागमध्ये मिलिंद आणि अंकिताचा विवाहसोहळा कुटुंबीय आणि निकटवर्तीयांच्या उपस्थितीत पार पडला. दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती. तसेच लग्नानंतर अंडरवॉटर रोमान्स मुळेही दोघं खूप चर्चेत होते.


खुद्द अंकितानेच सोशल मीडियावर अंडरवॉटर रोमान्सचा सेल्फी शेअर केला होता.यांत मिलिंद आणि अंकिता रोमँटिक पोजमध्ये एकमेकांच्या जवळ आल्याचे पाहायला मिळत आहे. जिथे सावलीही प्रकाशाच्या प्रेमात पडायला शिकेल अशी कॅप्शन अंकिताने या फोटोला दिली होती.मिलिंद आणि अंकिता अंडरवॉटर एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे पाहायला मिळाले. काही दिवसांआधी मिलिंद आणि अंकिता यांचे काही फोटोसुद्धा व्हायरल झाले होते.यापैकी एका फोटोत मिलिंद आणि अंकिता एकत्र वृक्षारोपण करत असल्याचे पाहायला मिळालं होते. हा फोटोसुद्धा अंकितानेच शेअर केला होता. आतापर्यंत दोघांनी अकरा झाडं लावल्याची माहिती देणारं कॅप्शनही अंकिताने या फोटोला दिले होते. अंकिता ही मिलिंदची दुसरी पत्नी आहे. २००६ साली मिलिंदने फ्रेंच अभिनेत्री मेलिन जंपानोई हिच्याशी लग्न केले होते.मात्र आता दीड वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर मिलिंद आणि अंकिता लग्नबंधनात अडकले. अंकिता मूळची दिल्लीची रहिवाशी असून तिचे खरे नाव सुंकुस्मिता कंवर आहे.


मिलिंदने त्याच्या या गर्लफ्रेंडची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना करून दिली.तो नेहमीच तिचे काही फोटोज् सोशल मीडियावर अपलोड करीत असतो.आता त्याने त्याच्या या गर्लफ्रेंडसोबत एक व्हिडीओ शेअर केला असून,त्यामध्ये तो चक्क तिला पाठीवर बसवून पुशअप्स मारताना दिसत आहे.वास्तविक मिलिंद स्वत:ला फिट ठेवण्यासाठी नियमितपणे वर्कआउट करीत असतो.त्यामुळेच या वयातही तो कमालीचा फिट दिसतो. व्हिडीओमध्ये मिलिंद पुशअप करीत असून त्याची गर्लफ्रेंड चक्क त्याच्या पाठीवर बसलेली आहे.अशातही मिलिंद सहजतेने पुशअप करताना दिसत आहे. 
Web Title: Honeymoon Pics: Milind Soman, with wife Ankita looking at a bikini, was like this
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.