​प्रभासच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज! बॉलिवूड डेब्यूसाठी ‘बाहुबली’ सज्ज!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2018 08:56 AM2018-01-02T08:56:38+5:302018-01-02T14:26:38+5:30

‘बाहुबली’ प्रभासच्या बॉलिवूड डेब्यूकडे सगळेच डोळे लावून बसले आहेत. ‘बाहुबली’नंतर प्रभासच्या ‘बाहुबली2’ने इतिहास रचला. या चित्रपटाच्या अफाट यशानंतर साऊथ ...

Gudnews for fans of Prabhas! 'Bahubali' ready for Bollywood debuts !! | ​प्रभासच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज! बॉलिवूड डेब्यूसाठी ‘बाहुबली’ सज्ज!!

​प्रभासच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज! बॉलिवूड डेब्यूसाठी ‘बाहुबली’ सज्ज!!

googlenewsNext
ाहुबली’ प्रभासच्या बॉलिवूड डेब्यूकडे सगळेच डोळे लावून बसले आहेत. ‘बाहुबली’नंतर प्रभासच्या ‘बाहुबली2’ने इतिहास रचला. या चित्रपटाच्या अफाट यशानंतर साऊथ स्टार प्रभास सगळ्यांच्या गळ्यातील ताईत झालायं. साहजिक हा सुपरस्टार कधी एकदा बॉलिवूडमध्ये दिसतो, असे चाहत्यांना झालेयं. खरे तर ‘बाहुबली2’ने प्रभासला मिळवून दिलेली लोकप्रीयता कॅश करत कुठला ना कुठला बॉलिवूड दिग्दर्शक प्रभाससोबत चित्रपट जरूर बनवणार, असेच सगळ्यांना वाटले होते. तसे प्रयत्नही झालेत. पण या प्रयत्नांना यश येता येता राहिले.  खरे तर अगदी सुरुवातीला करण जोहर दिग्दर्शक एस. एस. राजमौलीला सोबत घेऊन प्रभासला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार अशी बातमी आली होती.  करण जोहर प्रभासला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यास अगदी तयार होता. त्याने याबद्दल  प्रभाससोबत चचार्ही केली होती. पण प्रभासने म्हणे, या प्रोजेक्टसाठी २० कोटी रूपयांची मागणी केली. ही रक्कम ऐकून करण जोहरची बोलतीच बंद झाली.  यानंतर करणने म्हणे प्रभासला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याचा इरादाच सोडून दिला. यादरम्यान प्रभास ‘साहो’ या चित्रपटात बिझी झाला. पण  कदाचित ‘साहो’नंतर प्रभासला बॉलिवूडमध्ये पाहण्याची चाहत्यांची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. होय, खुद्द प्रभासने याबाबतचे संकेत दिले आहेत.

अलीकडे एका ताज्या मुलाखतीत प्रभासने आपल्या बॉलिवूड डेब्यूबद्दल खुलासा केला. मी खूप हिंदी चित्रपट पाहतो. मी हैदराबादेत राहतो. इथले ६० टक्के लोक हिंदी बोलतात. त्यामुळे हिंदी भाषा मला कधीच परकी वाटली नाही. बॉलिवूडच्या अनेक चांगल्या आॅफर्स मला मिळत आहेत. तीन वर्षांपूर्वी मी बॉलिवूडच्या एका स्क्रिप्टला होकार दिला होता. ती एक प्रेमकथा होती. ‘साहो’नंतर मी हा चित्रपट करणार आहे, असे प्रभास यावेळी सांगितले. आता प्रभासने बॉलिवूड डेब्यूचे संकेत दिल्यावर चाहत्यांना आणखी काय हवे?

ALSO READ : प्रभास अ‍ॅक्शनमध्ये ‘बाहुबली’ला देणार मात; यांनी केला दावा !

 तूर्तास प्रभास आपल्या ‘साहो’ चित्रपटात बिझी आहे. प्रभासचा हा चित्रपट तामिळ, तेलगू आणि हिंदीत तयार होत आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर, चंकी पांडे, जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश यासारख्या बॉलिवूड स्टार्सची वर्णी लागली आहे. अगदी काल-परवा या चित्रपटाचे फर्स्ट लूक जारी करण्यात आला होता.  

Web Title: Gudnews for fans of Prabhas! 'Bahubali' ready for Bollywood debuts !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.