'Entry in' Housefull 4 'will be an actress! | ‘हाउसफुल-४’ मध्ये ‘या’ अभिनेत्रीची होणार ग्रॅण्ड एंट्री!!

दिग्दर्शक साजिद नाडियादवाला यांच्या ‘हाउसफुल’ सीरिजच्या चौथ्या चित्रपटातील कास्टिंगचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. आतापर्यंत या चित्रपटाबद्दल अनेक कलाकारांचे नाव समोर आले आहे. चित्रपटात अक्षयकुमार, क्रिती सॅनन, रितेश देशमुख आणि बॉबी देओल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर आणखी एक नाव समोर आले आहे. होय, अभिनेत्री पूजा हेगडेचे नाव आता समोर आले असून, तिची टीममध्ये ग्रॅण्ड एंट्री होणार आहे. 

दरम्यान, जर ‘हाउसफुल-४’ मध्ये पूजाचे नाव निश्चित झाल्यास हा तिचा दुसरा चित्रपट ठरणार आहे. याअगोदर पूजा अभिनेता हृतिक रोशनसोबत आशुतोष गोवारीकर यांच्या ‘मोहनजोदडो’ चित्रपटात बघावयास मिळाली होती. आता तिचा हा दुसरा चित्रपट असणार आहे. वास्तविक याबाबतची अद्यापपर्यंत अधिकृत घोषणा केली गेली नाही. काही दिवसांपूर्वीच साजिदने म्हटले होते की, लवकरच या चित्रपटातील कास्टबद्दल तो अधिकृत घोषणा करणार आहे. हा चित्रपट पुढच्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. असे म्हटले जात आहे की, हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वात महागडा चित्रपट असणार आहे. चित्रपटाचे बजेट दोनशे कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. चित्रपटासाठी हॉलिवूड येथून वीएफएक्स टीमलाही बोलावण्यात आले आहे. ‘हाउसफुल-४’ची कथा पुनर्जन्मावर आधारित असणार आहे. याविषयी काही दिवसांपूर्वीच साजिद नाडियादवालाने सांगितले होते की, ‘या विषयावर बॉलिवूडमध्ये बरेचसे गंभीर चित्रपट बनविण्यात आले आहेत. मात्र मी या विषयावर कॉमेडी चित्रपट बनविणार आहे. या चित्रपटाशी संबंधित आणखी एक वैशिष्ट्य असे की, संपूर्ण चित्रपट थ्रीडी तंत्रावर बनविला जाणार आहे. या चित्रपटातील वीएफएक्स तंत्रज्ञानावर निर्मात्यांकडून तब्बल ७५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हा चित्रपट साजिद खान दिग्दर्शित करणार आहे. 
Web Title: 'Entry in' Housefull 4 'will be an actress!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.