दिशा पटानीच्या बिकीनी फोटोची सोशल मीडियावर धूम, १७ तासांत १६ लाख हिट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 01:05 PM2018-12-28T13:05:05+5:302018-12-28T13:08:19+5:30

दिवसेंदिवस तिच्या फॅन्सच्या संख्येत वाढ होत आहे. दिशा पटानीने एक फोटो शेयर केला आहे. हा फोटोला  17 तासाच्या आत 16 लाखपेक्षा जास्त वेळा पहिला गेला.

Disha Patani's Bikini Photo on Social Media, 16 Lakh Hits In 17 Hours | दिशा पटानीच्या बिकीनी फोटोची सोशल मीडियावर धूम, १७ तासांत १६ लाख हिट्स

दिशा पटानीच्या बिकीनी फोटोची सोशल मीडियावर धूम, १७ तासांत १६ लाख हिट्स

googlenewsNext

सध्या सोशल मीडियावर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींना  अनेक वेळा त्यांच्या फॅशन एक्सपेरिमेंटविषयी ट्रोल केले जाते. असेच काही आता दिशाबद्दलही झाल्याचे पाहायला मिळत आहे.आपल्या अभिनयाने तसंच सौंदर्याने रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावरही बरीच अक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासह शेअर करत असते. दिवसेंदिवस तिच्या फॅन्सच्या संख्येत वाढ होत आहे. दिशा पटानीने एक फोटो शेयर केला आहे. हा फोटोला  17 तासाच्या आत 16 लाखपेक्षा जास्त वेळा पहिला गेला. तर दुसरीकडे  सोशल मीडिया यूजर्स तिला खूप ट्रोलही करत आहेत. सोशल मीडिया यूजर्स दिशाच्या फोटोवर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. 

दिशाच्या फोटोला युजर्सकडून अशा कमेंटस मिळण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही तिला तिच्या ड्रेसिंग स्टाइलवरून 
ट्रोल केले गेले आहे. दिवाळीत दिशाने इन्स्टाग्राम तिचा एक फोटो पोस्ट केला होता. या फोटात तिने लाईट क्रिम रंगाचा लहेंगा घातला आणि त्यावर त्याच रंगाची ओढणी घेतली आहे आणि तिच्या हातात दिवा होता.

पण या लहेंगावर तिने ब्लॉऊज घालण्याऐवजी स्पोटर्स ब्रा घातली होती. त्यामुळे नेटिझन्सने तिची चांगलीच खिल्ली उडवली होती. दिशाने दिवाळीच्या निमित्ताने हा फोटो शेअर केला असला तरी तिने त्यासोबत काहीही कॅप्शन शेअर केलेले नव्हते. पण तिचा हा फोटो पाहून नेटिझन्स चांगलेच संतापले होते. दिशा तू ब्लॉऊज घालायला विसरलीस का, तू यात खूपच वाईट दिसत आहेस... दिवाळीला तरी चांगले कपडे घालत जा, स्पोटर्स ब्राला ब्लाऊजसारखे कोण घालतं का, फोटो क्लिक करण्याआधी कपडे घालायला विसरलीस का यांसारख्या चित्रविचित्र प्रतिक्रिया दिशाच्या फॅन्सने तिच्या फोटोवर दिल्या होत्या.

Web Title: Disha Patani's Bikini Photo on Social Media, 16 Lakh Hits In 17 Hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.